रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 11:27 IST2026-05-15T11:26:40+5:302026-05-15T11:27:52+5:30

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या १० दिवसांतील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.

28 year old boy dies by electrocution on jailer 2 set in chennai starring rajinikanth | रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू

रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू

सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी 'जेलर २' चित्रपटाच्या सेटवरून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. चेन्नईतील पनैयूर येथील एका खासगी स्टुडिओमध्ये चित्रपटाच्या प्रोडक्शनचे काम सुरू असताना, आर्ट डिपार्टमेंटमधील कार्तिकेयन नावाच्या २८ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला आहे. एका घराचा सेट तयार करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत असून, कनाथुर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या १० दिवसांतील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. काही दिवसांपूर्वीच हैदराबादमध्ये सुपरस्टार प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर जात असताना क्रू मेंबर्सच्या गाडीला अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला होता. अशातच 'जेलर २' च्या सेटवर घडलेल्या या घटनेने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, निर्मात्यांनी काही आठवड्यांपूर्वीच शूटिंग पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते, मात्र अद्याप काही काम बाकी असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत बोलायचे झाले तर, रजनीकांत यांनी हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप अपूर्ण असलेले काम पाहता, चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सन पिक्चर्सने एप्रिल महिन्यातच रॅप-अप पार्टीचे फोटो शेअर केले होते, परंतु तांत्रिक कामे किंवा पॅचवर्क सुरू असतानाच हा भीषण अपघात घडल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे.

२०२३ मध्ये आलेल्या 'जेलर'ने जगभरात ६०४.५० कोटींची कमाई करून इतिहास रचला होता. या सीक्वेलमध्ये रम्या कृष्णन, योगी बाबू आणि मिरना पुन्हा एकदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत यांचा '२.०' आणि विजयचा 'लिओ' यांच्यानंतर 'जेलर' हा सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तमिळ चित्रपट ठरला होता. आता 'जेलर २' कडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत, मात्र या दुःखद घटनेमुळे सध्या चित्रपटाच्या टीमवर शोककळा पसरली आहे.

Web Title : रजनीकांत की 'जेलर 2' के सेट पर हादसा, युवक की मौत

Web Summary : चेन्नई में 'जेलर 2' के सेट पर बिजली के झटके से 28 वर्षीय युवक की मौत हो गई। यह प्रभास की फिल्म के सेट पर हुई हालिया दुर्घटना के बाद हुआ है। फिल्म की रिलीज की तारीख में देरी हो सकती है।

Web Title : Tragedy on Rajinikanth's 'Jailer 2' Set: Young Man Dies

Web Summary : A 28-year-old art department worker died on the 'Jailer 2' set in Chennai due to electrocution while building a set. This follows a recent accident on Prabhas' film set. The film's release date may be delayed despite initial wrap-up announcements.