शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

30 ते 44 वयोगटातील सर्वांचे आजपासून होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 5:00 AM

शनिवारी जिल्ह्यातील ३० केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणास सुरुवात होणार आहे; तर सोमवार (दि. २१) पासून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर या गटातील नागरिकांना लस मिळणार आहे. या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देआज ३० केंद्रांवर सुरुवात, सोमवारपासून सर्वच केंद्रांवर मिळणार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आज, शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यात शहरी भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणीमध्ये ५० टक्के सूट राहणार आहे. ग्रामीण भागात संपूर्णपणे ऑफलाईन पद्धतीनेच लसीकरण होणार असल्यामुळे नोंदणी करण्यातील तांत्रिक अडचणींचा अडथळा दूर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता लसीकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे.शनिवारी जिल्ह्यातील ३० केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणास सुरुवात होणार आहे; तर सोमवार (दि. २१) पासून जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर या गटातील नागरिकांना लस मिळणार आहे. या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्यामुळे लस घेण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तरीही आरोग्य कर्मचारी, महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नांनी बऱ्याच प्रमाणात जनजागृती करण्यात यश आले.

केंद्रावर गर्दी करू नयेकोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. शासनाकडून टप्प्याटप्प्याने लसीकरणासाठी वयोगट निश्चित केला जात आहे. आता ३० वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात येत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. केंद्रावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच लसीकरणासाठी येताना शारीरिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर आवश्यकतेनुसार करणे याबाबत काळजी घेणे आवश्यक राहणार आहे.

या केंद्रांवर होणार आज लसीकरण

आज, शनिवारी ३० वर्षांवरील सर्व नागरिकांना जिथे लस मिळणार आहे, त्यात जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि पोर्ला, बोदली, अमिर्झा, पोटेगाव, गोकुळनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, देसाईगंज ग्रामीण रुग्णालय आणि सावंगी, कुरुड, कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, चामोर्शी ग्रामीण रुग्णालय आणि भेंडाळा, कुनघाडा, आमगाव, कोनसरी, मार्कंडा प्राथमिक आरोग्य केंद्र, आरमोरी उपजिल्हा रुग्णालयासह वडधा, देलनवाडी, वैरागड, भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयासह देऊळगाव, कढोली, मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, अहेरी उपजिल्हा रुग्णालयासह महागाव, कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरची ग्रामीण रुग्णालयासह बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या