आॅडिशनदरम्यान तरुणाने सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 22:03 IST
चित्रपटात हिरो होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आॅडिशनला आलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
आॅडिशनदरम्यान तरुणाने सोडले प्राण
चित्रपटात हिरो होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आॅडिशनला आलेल्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. पंढरपुरात आॅडिशन देताना ‘आई’ अशी आरोळी मारत खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला.सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यामध्ये ‘गाजर’ चित्रपटाची आॅडिशन सुरु होती. यावेळी बीडचा प्रफुल्ल बोखारे हा तरुणही आला होता. त्याला दिलेल्या डायलॉगनुसार ‘आई’ अशी आरोळी त्याने दिली आणि तो खाली पडला, त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला.तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.