शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

जगातील सर्वांग सुंदर 'ट्री टनेल्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:19 AM

अतिजास्त ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध असलेल्या टोकियो शहरात सुंदर बगीचे,...

जिंकगो ट्रि टनेल, टोकियो (जपान)अतिजास्त ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध असलेल्या टोकियो शहरात सुंदर बगीचे, इमारतींची कमी नाही. येथील जिंकगो ट्री टनेल शहरातील अपार्टमेंट आणि सार्वजनिक स्थळांना जोडतो. शरद ऋतूमध्ये तर येथील झाडांची सगळी पाने जेव्हा पिवळी होतात तेव्हा येथील दृश्य पाहण्यासारखे असते.कंट्री रोड, मिल्टन अँबाट (डेवॉन)डेवॉन येथील मिल्टन अबोटला जाणारा राजमार्ग आपण याला म्हणू शकतो. हजारो बीच झाडांच्या सावलीमध्ये हा डोळे दिपवून टाकणारा सरळ रस्ता आहे. टाविस्टॉक अँबे व्यक्तीचे नाव या छोट्याशा गावाला दिलेले आहे.बॉटनी बे प्लॅन्टेशन (साऊथ कॅरोलिना)शेकडो ओकच्या झाडांनी तयार झालेला सदाबहार ट्री टनेल जगातील सर्वात सुंदर ट्री टनेल मानला जातो. साऊथ कॅरोलिना येथील एडिस्टो आयलँवरच्या बॉटनी बे प्लॅन्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे. वन्यजीव संवर्धन कार्यक्रमांतर्गत १९३0 मध्ये क्लाऊड प्लॅन्टेशन आणि ब्लीक हॉल प्लॅन्टेशन मिळून बॉटनी बे प्लॅन्टेशनची निर्मिती करण्यात आली होती.कवाझू चेरी ट्री टनेल, शिझूका (जपान)चेरी ब्लॉसमच्या अतिशय सुंदर झाडांनी नटलेला येथील ट्री टनेल जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रात्री अतिशय रम्य प्रकाशात कवाझू चेरी ट्री टनेल न्हाऊन निघताना बघणे अविस्मरणीय अनुभव आहे. एकदा तरी आपण याला भेट दिली पाहिजे.सेंट्रल पार्क, मॅनहॅटन (न्यूयॉर्क)न्यूर्याक म्हटले की आठवते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि सेंट्रल पार्क. उंचच्या उंच इमारतींच्या मधोमध असणारे हिरवळीचे साम्राज्य कोणालाही थोडा वेळ निवांत बसायला भाग पाडते. सकाळी सकाळी तर सूर्योदयाचा आनंद येथे बसून घ्यायलाच हवा. १८५७ मध्ये हा पार्क उघडण्यात आला.डार्क हेजेस, अंट्रिम (उत्तर आयर्लंड)फोटोग्राफर्ससाठी स्वर्ग म्हणजे उत्तर आयर्लंड येथील डार्क हेजेस ट्री टनेल. झाडांची गर्दी एवढी आहे की या रस्त्यांच्या काही ठिकाणी तर सूर्यप्रकाशही पोहचत नाही. अनेक लोक रात्रीच्या वेळी येथून जाण्यासाठी घाबरतात.निसर्गाची सुंदरता ही सर्वश्रेष्ठ आहे. रंगीबेरंगी फुले, झाडे मनाला नेहमीच आकर्षित करीत असतात. अशी रंगबीरंगी फुलांची झाडे रस्त्याच्या दुतर्फा असतील तर प्रवासाचा आनंद अगदी द्विगुणीत होऊन जातो. जगातील अशाच अतिशय मनमोहक 'ट्री टनेल्स'ची माहिती येथे देत आहोत.