महिला दिनी एअर इंडिया रचणार इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 01:52 IST
यंदाचा महिला दिन सरकारी हवाई वाहतूक कंपनी असलेली एअर इंडियासाठी स्पेशल आहे. महिला दिनाच्या निमित्ताने एअर इंडिया एक इतिहास रचणार आहे. जगातील सर्वात लांबच्या हवाई मार्गावर असलेल्या नवी दिल्ली ते अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत खास महिलांसाठी विमान सफर घडवली जाणार आहे.
महिला दिनी एअर इंडिया रचणार इतिहास
यंदाचा महिला दिन सरकारी हवाई वाहतूक कंपनी असलेली एअर इंडियासाठी स्पेशल आहे. महिला दिनाच्या निमित्ताने एअर इंडिया एक इतिहास रचणार आहे. जगातील सर्वात लांबच्या हवाई मार्गावर असलेल्या नवी दिल्ली ते अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत खास महिलांसाठी विमान सफर घडवली जाणार आहे. या विमानात चार पायलट आणि १४ क्रू मेंबर्स असतील. विशेष म्हणजे, या सर्व महिला असतील. आज ६ मार्च रोजी या विमानाचे उड्डाण झाले. ८ मार्चला हे विमान भारतात परत येईल. याचसोबत महिला दिनाच्या निमित्ताने देशभरातही काही मार्गांवर महिलांसाठी विमान सफरींचे आयोजन करण्यात आले आहे. या विमानाच्या इंजिनीअर, तसेच उड्डाणाच्या वेळी बोर्डिंग पास देण्यासाठी आणि तपासण्यासाठी एअरपोर्ट गेटवरही महिलाच असतील. एअर इंडियाच्या एकूण २७,५०० कर्मचाºयांपैकी ३,८०० महिला आहेत. दरवर्षी महिला दिनाला एअर इंडियातर्फे अशा प्रकारच्या विमानाचे उड्डाण करविले जाते.