भारतीयांची मने जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:22 IST
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलिकॉन व्हॅलीतील भारतीयांची मने जिंकली
भारतीयांची मने जिंकली
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलिकॉन व्हॅलीतील भारतीयांची मने तर जिंकलीच परंतु त्यांच्या भाषणापूर्वी गायक कैलास खेर याने देखील आपला जलवा दाखविला. आपल्या पहाडी आवाजाने कैलाशने सिलिकॉन व्हॅलीमध्ये जादूच केली. कैलाशचे सॅप सेंटरच्या भव्य रंगमंचावर आगमन होताच प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले. कैलाशने मंगल पांडे चित्रपटातील 'मंगल मंगल..' या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.