का बिघडतात पती -पत्नीचे संबंध ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 19:43 IST
पती -पत्नीला जीवनभर एकमेकांसोबत काढायचे असते.
का बिघडतात पती -पत्नीचे संबंध ?
त्याकरिता त्यांनी एकमेकांना समजून घेऊन नातेसंबंध टिकविणे आवश्यक आहे. परंतु, आजकाल नातेसंबंधात मोठा दुरावा निर्माण होत आहे. सोबत जीवन मरणाची शपथ घेतलेली असूनही नाते टिकत नाही. त्यामुळे कुठेही आपल्याला ब्रेकअप झालेले ऐकायला मिळते. सेलिब्रेटीजपासून अनेकांचे नातेसंबंध खराब होऊन, त्यांना प्रेमामध्ये धोका झालेला आहे. सर्व काही सुरळीत असतांनाही संबंध का ?बिघडतात याची ही माहिती. कमी बोलणे : दोघांचे नाते चांगल्या गोष्टी बोलल्याशिवाय होऊच शकत नाही. आपल्या पार्टनरला आपली आवड निवड माहित नसेल तर ते आपल्यासाठी योग्य नाही. एक दुसºयासोबत अपूर्ण बोलणे व विना प्रेमाची गोष्टीमुळे दोघांच्याही मनात शंका येण्यास सुरुवात व्हायला लागते. व येथूच संबंध बिघडण्यास सुरुवात होते. भरोसा करा: पती - पत्नीचे नाते हे मधुर असावयाला हवे. सात जन्माच्या या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. याकरिता दोघांनेही एकमेकांवर संपूर्णपणे भरोसा के ला पाहीजे. जादा अपेक्षा ठेवू नये : चित्रपटामध्ये प्रेयसीला तिचा बायफ्रेंड सर्व गोष्टी पुरवते. ते पाहून अनेकींना वाटते की, आपल्या पतीनेही आपल्या सर्व अपेक्षा कराव्या. परंतु, आपले जीवन हा चित्रपट नाही, हे नेहमी लक्षात घेणे आवश्यक आहे. आपण जर पतीवर नेहमी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दबाव आणत असाल तर तो आपल्यालला कधीही सोडू शकतो. प्रामाणीक राहावे : एकमेकांसोबत नेहमी प्रामाणीक राहणे गरजेचे आहे. अनेक मोठमोठ्या नातांमध्ये प्रामाणीक न राहिल्याने संबंध बिघडायला लागतात. तसेच पतीला शिव्या देणे टाळावे. यामुळे सुद्धा तुमचे संबंध बिघडू शकतात. आदेश देण्याचे काम करु नये : दोघांमध्ये मुधर नाते राहीले पाहीजे. याकरिता एकमेकांना कोणतेही काम करण्याचे आदेश देऊ नका. आपला जोडीदार आपल्याला केवळ आदेश देण्याचेच काम करतो. अशी एकमेकांच्या मनात भावना निर्माण होते. त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण व्हायला लागतो.