इंटरनेट युजर्स @ चिन्ह का वापरतात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 17:53 IST
29 वर्षीय कम्प्युटर इंजीनियर टॉमलिंसन यांनी या चिन्हाचा वापर केला होता.
इंटरनेट युजर्स @ चिन्ह का वापरतात?
जगभरात @ या चिन्हाला वेगवेगळ्या नावाने बोलले जाते. चीनमध्ये फिरवलेला ए असे म्हणतात. तैवानच्या भाषेत लहान उंदीर तर डॅनिश भाषेत हत्तीची सोंड असे म्हटले जाते. युरोपातील आणखी एका देशात @ या चिन्हाला कीडा म्हणतात. तर मध्य आशियाई देशात कझाकस्तानमध्ये चंद्राचा कान, जर्मनीमध्ये स्पायडर मंकी, बोस्नियामध्ये झक्की अ असे म्हटले जाते. स्लोवाकियामध्ये अचारी फिश रोल, तुर्कीमध्ये सुंदर अ असे म्हटले जाते.हे चिन्ह पहिल्यांदा कधी वापरले याची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. ईमेल आयडीसाठी @ या चिन्हाचा वापर 1971 मध्ये झाला होता. 29 वर्षीय कम्प्युटर इंजीनियर टॉमलिंसन यांनी या चिन्हाचा वापर केला होता. सध्या हे चिन्ह जगभरात ईमेल आयडीमध्ये वापरले जाते.त्यावेळी ईमेलचा वापर अधिक केला जात नव्हता. इंटरनेटही नव्हते. ईमेल आयडीमध्ये या चिन्हाचा वापर होण्याआधी इंग्रजीमध्ये भाव सांगण्यासाठी केला जात असे.