का होतेय बेकहॅमवर मुलीसोबतच्या फोटोवरून टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 22:56 IST
व्हिक्टोरियाने आपली मुलगी हार्परला ओठांवर किस करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.
का होतेय बेकहॅमवर मुलीसोबतच्या फोटोवरून टीका?
व्हिक्टोरिया बेकहॅम हे फॅशन जगतातील सर्वात लोकप्रिय नाव. एका यशस्वी महिला आणि ‘सुपरमॉम’म्हणून ती ओळखली जाते. परंतु सध्या तिच्यावर मुलीसोबत काढलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर जोरदार टीका केली जातेय. व्हिक्टोरियाने आपली मुलगी हार्परला ओठांवर किस करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यावरूनच तिला टीकेचे धनी व्हावे लागत आहे.पाच वर्षीय हार्परच्या वाढदिवसानिमित्त व्हिक्टोरियाने हा फोटो शेअर केला होता. आतापर्यत पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केले असले तरी काही नेटीझन्स हा फोटो पाहून फारसे खुश नाहीत.एकाने फोटोवर कमेंट केले की, ‘आईवडिलांनी मुलांचे प्रेमाने चुंबन घेण्यास काही हरकत नाही. परंतु ओठांवर चुंबन घेण्याला माझा विरोध आहे.’ स्वत:च्या मुलांना ओठांवर किस करणे कितपत योग्य-अयोग्य आहे यावर सोशल मीडियावर मग चर्चा सुरू झाली. सभ्याचारपद्धती तज्ज्ञ लिझ ब्रिऊरनुसार, पालकांनी मुलांना ओठांवर चुंबन करणे तसे पाहिले तर थोडी आॅड गोष्ट आहे; परंतु हा सर्वस्वी पालकांचा निर्णय आहे. त्यांना जर ते योग्य वाटत असेल चुक की बरोबर अशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मी माझ्या मुलांना ओठांवर किस करत नाही पण व्हिक्टोरियाला त्यात काही गैर वाटत नसेल तर इतरांना तिच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.