सक्सेस मॅरिड लाईफ म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:28 IST
हॉलिवूड हिरो विल स्मिथ आणि जेडा पिंकेट स्मिथ विभक्त होणार असल्याच्या अफवा अनेक वर्षापासून उठतात आणि...
सक्सेस मॅरिड लाईफ म्हणजे काय?
हॉलिवूड हिरो विल स्मिथ आणि जेडा पिंकेट स्मिथ विभक्त होणार असल्याच्या अफवा अनेक वर्षापासून उठतात आणि विरून जातात. मात्र या जोडीचा संसार अखंड सुरूच आहे. नुकतीच त्यांनी एकत्र वाटचालीची २0 वर्षे पूर्ण केली. हॉलिवूडमध्ये इतकी वर्षे लग्न टिकणे, ही तशी नवलाचीच गोष्ट. यामागील गुपित सांगताना विल म्हणाला, सक्सेस मॅरिड लाईफ म्हणजे काय?ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. पण, कुठलेही नाते असे ठरवून जपले जात नाही. आम्ही दोघांनीही रिलेशनशिप टिकवण्यावर कधीही काम केले नाही. आम्ही दोघेही स्वत:कडे म्हणजे स्वत:च्या वर्तनाकडे लक्ष देतो. एकमेकांसोबत पूवीर्पेक्षा जास्त चांगले वागण्याचा आमचा प्रयत्न असतो. आम्ही वेगळे होणार नाही, हे पुन्हा एकदा मी जाहीर करतो.