शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

रोज सतत वापरतो ते ‘इमो’ काय सांगतात?

By admin | Published: July 17, 2017 3:35 PM

आज जागतिक इमोजी डे साजरा होतोय; आपल्या व्यक्त होण्यात ही चित्र कुठून आली, याची ही एक झलक!

- शिल्पा मोहितेहसणारे, चिडवणारे छोटे छोटे इमोटिकोन किंवा स्मायली आज तुमच्या आमच्या दैनंदिन भाषेचा अविभाज्य घटक झाले आहेत. सकाळी गुड मॉर्निंग बरोबर येणारा सूर्य असो किंवा मुलीच्या हट्टाला कंटाळून दिलेला स्ट्रेट फेस, मित्राच्या जोक वर दाद म्हणून दिलेला खिडळणारा स्मायली असो वा कुणा खास व्यक्तीला दिलेलं चुंबन आणि हार्ट्स. या स्मायली किंवा इमोटिकॉन्स ने आपली चॅट विंडो आनंदी आणि थोडी जास्तच रंगीबेरंगी केलेली आहे. पण तुम्हाला आठवतोय का पहिला वहिला एमोटिकोन ? जर तुम्ही इंटरनेटच्या सुरूवातीच्या काळात संगणक वापरला असेल तर तुम्ही कदाचित आजही  :)  हे चिन्ह स्मायली म्हणून कधी कधी वापरत असाल. या चिन्हाचा आणि तात्पर्यानं मॉडर्न स्मयलीचा जनक होता स्कॉट फॅहलमन यांनी साधारण १९८२ साली पाठवलेला हा मेसेज.

 "I propose that the following character sequence for joke markers: " :) Read it sideways." 
 
या छोट्या चिन्हापासून सुरूवात झाली आणि नकळत प्राचीन काळातील चित्र लिपी पुन्हा एकदा वापरात आली. पुन्हा एकदा सिद्ध झालं की व्हिज्युअल किंवा दृश्यमान गोष्टी पटकन समजतात आणि भावतातही. एका सर्व्हेनुसार स्मायलीच्या वापरानं संभाषण फक्त जलदच नाही तर सोपंही होते.
मजा म्हणजे आजकाल स्मायलीचा वापर औपचारिक संभाषणात देखील सर्रास होतो. त्यामुळे मी अजून फाइलची वाट बघतोय बरोबर एक स्मायली पाठवल्यास आॅफीसच्या कामात खेळीमेळीचं वातावरण राहू शकतं. सोशियल मीडीयावर विविध इमोटिकॉनचा वापर करणारे लोक अधिक फेमस आणि लाडके असल्याचं दिसून येतं. अलीकडेच फेसबूकमध्ये सुद्धा, लाइक बटनची जागा इमोटिकॉन्सने घेतलेली आहे. स्मायली पाठवणं अगदी सहज असलं तरी ते कधी कधी भावनाशून्य असू शकतं. पण ते स्वीकारणाऱ्या व्यक्तीची प्रतिक्रि या बऱ्याच वेळा खऱ्या चेहऱ्याला व्हावी अशीच असते, त्यामुळे भावनिक न होता भावूक संभाषण घडू शकतं. त्यामुळे या इमोटिकॉन्समुळे आपण काहीसं खोटं आणि काहीसं अभावनिक होतोय का? अशी टीकाही हल्ली ऐकायला मिळते.
 
अजून एक आरोप इमोटिकॉन्सवर आहे आणि तो म्हणजे डबल मिनिंगचा. पीच आणि एग्गप्लान्ट हे अगदी परवा परवापर्यंत फक्त फळ-भाजी याच सदरात मोडत होते. आता मात्र त्याचे रूपांतर आक्षेपार्ह इमोटिकॉन्स मधे झाले आहे. शिवाय थम्सअप, हायफाई, पॉइंटर यांच्या सोज्वळ रांगेत चावट मिडल फिंगरनेसुद्धा नंबर लावलाच आहे.पण या वरवरच्या नफानुकसाना पलीकडे एमोटिकोनचा काही उपयोग होऊ शकतो का ? दिवसेंदिवस बिझनेसेस इमोटिकॉन्सचा वापर विविध ब्रॅँडिंग आणि मार्केटिंगच्या उपक्र मात करताना दिसत आहेत. आय होपसारख्या काही कंपनीनी आपले लोगोज स्मायली सारखे रीब्रॅण्ड केलेत तर डॉमीनोजने आॅर्डर प्रोसेस स्मायलीमय करून टाकली आहे. मार्केटींगचं विश्व जास्तीत जास्त मार्केटर आणि कन्झ्यूमरच्या भावनिक नातेसंबंधावर अवलंबुन राहायला लागलं आहे, त्यामुळे सगळ्यांनीच आता या इमोटिकॉन्सच्या वापराच्या दिशेनं धाव घेतली आहे.काळासोबत कम्युनिकेशन्सची, संवादाची साधनं बदलली. आता तर आपण बोलण्याइतकंच व्हॉट्सअ‍ॅपवर लिहून संवाद साधतो आहोत. त्यात या स्मायली सर्रास वापरतो. आपल्याला जे म्हणायचं ते या स्मायली पोहचवतात असं आपल्याला मनापासून वाटतंही अनेकदा.अश्मयुग पासून ते आधुनिक युगात खूप काही बदललं आहे पण एक गोष्ट बदलेली नाही. ती आहे माणसाला माणूस बनवणारी भावना. ही भावना कधी लेण्यातील चित्रांमधून तर कधी इमोटिकॉन्स मधून व्यक्त होताना दिसते, भाषेच्या पलीकडे जाउन संभाषण घडवते, हृदयांना जवळ आणते, जखमांवर फुंकर घालते. त्यामुळे कधी मजा म्हणून, कधी संभाषण प्रभावी करण्यासाठी तर कधी निव्वळ आळसामुळे हे स्मायली किंवा इमोटिकॉन्स तुमच्या चॅट विंडोमधे डोकावातच राहतील. आणि चेहऱ्यावरही एक आनंद फुलवत राहतील.

***

एक वर्षापूर्वी गूगलने जॉब करणार्‍या महिलांच्या आदरात 13 स्मायलीज प्रकाशित केल्या. खूप काळापासून गप्प असलेल्या मुठीच्या इमोटीकॉन्सला देखील यु एस इलेक्शननंतर वाचा फुटलेली दिसते. ट्रम्पच्या काही निर्णयांच्या विरोधात या आवळलेल्या मुठी सोशल मीडीयावर झळकल्या. मजामस्तीपलिकडे या स्मायली आता जाताना दिसतात.

***

इमो नावाचा एक उपचार
 
भावनांचे प्रतीक असलेल्या या इमोटिकॉन्सचा अजून एक सुंदर उपयोग ऑटीझमच्या क्षेत्नात काम करणार्‍यांनी केलेला आहे. भाषेची मर्यादा असलेल्या या मुलांची चाचणी इमोटिकॉन्सच्या चार्टद्वारे करण्यात येते. यात एखादी परिस्थिती त्या मुलाला / मुलीला सांगितली जाते आणि त्यावर प्रतिक्रि या म्हणून एमोटिकोन शोधायला सांगितलं जातं. जर भावना आणि इमोटिकोन मॅच करत नसतील तर अश्या मुलांना त्यावर उपचार दिले जातात.  बर्‍याचदा त्यांना शिकवण्यासाठी सुद्धा इमोटिकॉन्सचा वापर करता येतो. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या केस मधेसुद्धा इमोटिकॉन्स मदतीचा हात म्हणून पुढे आले आहेत.

(पूर्वप्रसिद्धी लोकमत आॅक्सिजन)