'वन नाईट स्टँड'बाबत मुलींना काय वाटते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:51 IST
आजच्या युगात 'कॅज्युअल सेक्स' ही गोष्ट कॉमन होत चालली आहे. 'रात गई, बात गई' म्हणत तरुणाई त्यांच्यास...
'वन नाईट स्टँड'बाबत मुलींना काय वाटते?
आजच्या युगात 'कॅज्युअल सेक्स' ही गोष्ट कॉमन होत चालली आहे. 'रात गई, बात गई' म्हणत तरुणाई त्यांच्यासमोर आलेला क्षण साजरा करते आणि लगेच ते विसरूनही जाते. परंतु स्त्रीमनाच्या दृष्टीने हे वाटते तितके सोपे नाही. वन नाईट स्टँडकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मुलींना शारीरिक सुख आणि भावनिक बंध वेगळे ठेवणे फार अवघड जाते. मग मुली अशावेळी नेमका काय विचार करतात? १. पश्चातापकाही मुली अशा संबंधांसाठी तयार होतात. मात्र नंतर त्यांना पश्चाताप वाटतो. त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. कितीही प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न केला तरी घडलेली गोष्ट त्यांना अस्वस्थ करीत राहते.२. निराशावन नाईट स्टँडनंतर अनेक मुली नर्व्हस होतात. आपण असे काही केले, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. परंतु हे खरे आहे, याची जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र स्वत:वरच राग यायला लागतो. ३. लाँग टर्मचा विचारकितीही 'नो स्ट्रिंग्ज अँटच्ड' ठरविले तरीही मुलींचा रिलेशनशिप वाढविण्याकडे कल असतो. असे जवळ आल्यानंतरचा अनुभव जर चांगला असेल मुली त्या मुलाकडे आकर्षित होतात.४. टाटा-बायबायअनेक वेळा हे 'वन नाईट स्टँड' फायद्याचे इरत नाहीत. दुसर्या दिवशी मुलीं तिथून कसा काढता पाय घेता येईल, याचा विचार करत असतात. ही सिच्युएशन दोघांसाठीही ऑकवर्ड असते. अखेर औपचारिक बोलणी किंवा ब्रेकफास्ट करून एकमेकाला टाटा-बायबाय केला जातो.