शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

​कार अपघातातून सही-सलामत वाचायचेय? मग असे शरीर हवे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 22:19 IST

‘टीसीए’ने पूर्णपणे कार-अपघातरोधक मानव कसा असेल याचा आराखडा विकसित केला आहे.

ज्या वेगाने मोटरवाहनांचा विकास होतोय, तेवढ्याच प्रमाणात अपघातातदेखील वाढत आहेत. थोड्या वेळ्यासाठी जर आपण असा विचार करा की, कोणत्याही प्रकारच्या कार अपघातात आपल्याला काहीच झाले नाही पाहिजे. पण असे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ आहे. ‘आॅस्टेलियाज् ट्रान्सपोर्ट अ‍ॅक्सिडेंट कमिशन’ने (टीसीए) याच प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे.एक ट्रॉमा सर्जन, अपघाततज्ज्ञ आणि एक आर्टिस्टचा सामावेश असलेल्या ‘टीसीए’ने पूर्णपणे कार-अपघातरोधक मानव कसा असेल याचा आराखडा विकसित केला आहे. त्यानुसार माणूस या फोटोसारखा दिसेल. त्याचे नामकरण त्यांनी ग्रॅहम असे केले आहे.मोनॅश विद्यापीठाच्या अपघात संशोधन केंद्रातील रस्ता सुरक्षा अभियंता व टीसीए सदस्य डेव्हिड लोगन यांनी माहिती दिली की, आपण ज्या वेगाने विकसित झालो आहोत त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने कार तंत्रज्ञान उत्क्रांत झाले आहे. आपल्या शरीरात सामन्यत: होणाऱ्या कार अपघातांचा आघात सहन करण्याची क्षमता नसते. ती असण्यासाठी आपल्या शरीरात काय बदल अपेक्षित आहे याचा आम्ही अभ्यास केला त्यातून ‘ग्रॅहम’चे हे रूप समोर आले.सर्वप्रथम तर अपघातामध्ये ग्रॅहमच्या मेंदूला आघात पोहचण्यापासून रोखण्यासाठी फार मोठ्या आकाराची कवटी गरजेची आहे. आंतर्गोल व भरपूर चरबीयुक्त त्याच्या चेहऱ्याला इजा होण्याची शक्यता फार कमी आहे. पाठ व मणक्याला सुरक्षित करण्यात करण्यासाठी ग्रॅहमची मानच गायब केलेली आहे. शरीरावर जखमा न होण्यासाठी त्याची त्वचा जाडजूड आहे. तसेच बरगड्यांवर हवेच्या पोकळीचा जास्तीचा थर दिलेला आहे.बरं हे झालं कार मधून प्रवास करत असताना. पण पायी चालत असताना जर कार येऊन धडकली तर काय? तर त्यासाठी त्याच्या पायाच्या घोट्याखाली सांध्याचा एक जोड अधिक दिलेला आहे. तसेच त्याचा गुडघादेखील अधिक लवचिक आहे.आॅस्ट्रेलियातील ‘टोवर्ड झीरो’ या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत ‘ग्रॅहम’ची निर्मिती करण्यात आली आहे.