शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भिंती बोलक्या करणारी पेंटिंग्ज

By admin | Updated: April 5, 2017 17:58 IST

घर सजवायचं आहे म्हणून घराच्या रिकाम्या भिंती पेंटिंग्जनं भरायच्या असं नाही. पेंटिंग्ज लावताना आपल्या घराचं स्वरूप, त्यातला माणसांचा स्वभाव त्यांच्या आवडी निवडी

- सारिका पूरकर - गुजराथीघर सजवायचं आहे म्हणून घराच्या रिकाम्या भिंती पेंटिंग्जनं भरायच्या असं नाही. पेंटिंग्ज लावताना आपल्या घराचं स्वरूप, त्यातला माणसांचा स्वभाव त्यांच्या आवडी निवडी यांचा विचार व्हायला हवा. असं झालं तर पेंटिंग्जमुळे घर नुसतं सजत नाही तर निर्जिव वाटणाऱ्या भिंती बोलक्या होतात. ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ या ओळीप्रमाणे ‘घरसजावटीसाठी भिंतीवरी पेंटिंंग असावे’ ही संकल्पना वापरली जाते. कारण घर फक्त निवासाचं अन सजावटीचं साधन नाही. तर घर हे तुमच्या विचारांचं, व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंबही असतं. भिंतीवर हे पेंटिंग्ज लावतानाही काही कल्पकता दाखवली तर त्या भिंतीचा आणि पेंटिंगचा नूर खऱ्या अर्थानं खुलतो. यासाठी घरातल्या भिंतींवर पेंटिंग्ज लावताना काही बाबी लक्षात ठेवाव्या लागतात इतकंच. 1) मान्यवर चित्रकारांची चित्रं, बाजारातील रेडिमेड फ्रेम्स, घरी तयार केलेल्या कलाकृती हे जर भिंतीवर लावत असाल तर ज्या ठिकाणी आसनव्यवस्था असेल तेथे शक्यतो त्या आय लेव्हलवर लावल्या जातील याची काळजी घ्या. तसेच सूर्याची प्रखर किरणे, पाणी थेट त्यावर जाणार नाही याचीही दक्षता घ्यायला हवी.2) पेंटिंग्ज जर सोफ्याच्या वरच्या बाजूला लावत असाल तर सोफ्यापासून 6 ते 12 इंच वर पेंटिंगचा तळाकडचा भाग यायला हवा. 3) विविध आकारातील चित्रं, कलाकृती ग्रूप करून एका ठिकाणी लावत असाल तर त्याच्या लूककडे लक्ष द्या. म्हणजेच जी मोठी चित्रं आहेत, ती डावीकडे, अथवा तळाशी राहू द्या, कारण आपल्या नजरेला डावीकडून उजवीकडे पाहण्याची सवय असते. जर एकाच आकाराची चित्रं असतील तर त्याची वजनाप्रमाणे मांडणी करा. जास्त वजनाचं चित्र मध्यभागी असू द्या. 4) बेडरूममध्ये पेंटिंग लावताना त्याला शक्यतो पर्सनल टच कसा देता येईल ते पाहावं. बेडरूममध्ये प्रवेश केल्यानंतर शांत, रिलॅक्स अनुभूती मिळायला हवी. म्हणून त्यानुसार चित्रांची निवड करावी.घरातला हॉल आपली आवड अभिरूची दाखवतो. त्यामुळे आपली आवड प्रतिबिंबित होणारी पेंटिंग्ज हॉलमध्ये लावावी. 5) पेंटिंग्ज लावताना घराची रचना कशी आहे, किती जागा उपलब्ध आहे, याचाही विचार करावा. फक्त मोकळ्या, मोठ्या भिंतींवरच चित्रं लावतात हा समज काढून टाकावा. दारे, खिडक्या यांच्यामधली, शेजारची जागा मोकळी असेल तर तेथेही चित्रं लावू शकता.6) पुस्तकांच्या कपाटावर मध्यभागीही छानसंचित्र लावू शकता, त्यामुळे हे कपाटदेखील उठून दिसेल आणि ते सजीव भासेल.7) एकापेक्षा जास्त चित्रं लावताना त्यांच्या फ्रेम्स ट्रॅडिशनल निवडा आणि एकाच रंगात रंगवून घ्या (काळा, पांढरा, तिपकरी) दिसायला ते फार सुंदर दिसतं.8) भिंतीवर चित्रं , कलाकृती लावण्यापूर्वी त्या चित्रांचा, कलाकृतींच्या रंगांच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा पट्टा कलाकृती लावण्याच्या जागेवर बॅकग्राऊंड म्हणून द्यावा. यामुळे चित्रं आणि भिंती उठावदार दिसतील. म्हणजेच चित्रात क्र ीम रंग असेल तर भिंतीवर लाल, जांभळ्या रंगाचा पट्टा देऊन घ्या. भिंतीचा लूक एकदम पालटेल!