विजय मल्याची १४११ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 16:21 IST
विविध बॅँकांचे ९ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्या यांची मुंबई व बंगळुरु येथील १४११ कोटी रुपयाची मालमत्ता शनीवारी जप्त करण्यात आली आहे.
विजय मल्याची १४११ कोटींची मालमत्ता जप्त
विविध बॅँकांचे ९ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी मद्यसम्राट विजय मल्या यांची मुंबई व बंगळुरु येथील १४११ कोटी रुपयाची मालमत्ता शनीवारी जप्त करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याप्रकरणी ‘ईडी’ ही कारवाई केली आहे.या मालमत्तेत मल्याचे ३४ कोटी रुपयांची बँकेतील रोख रक्कम, मुंबई आणि बंगळुरू येथील घरे अनुक्रमे १३०० आणि २२९१ चौरस फुटाची घरे, चेन्नई येथील ४.५ एकरचा औद्योगित भूखंड, कूर्ग येथील २८.७५ एकरवरील कॉफीची बागायत, युबी सिटी आणि बंगळुरू येथील निवासी तसेच औद्योगिक बांधकामे आदींचा समावेश आहे. विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवणारा मल्या कारवाईच्या भीतीने २ मार्च रोजी भारत सोडून पळून गेला आहे. आयडीबीआय बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी मल्या आणि या घोटाळ्यात त्याला साथ देणाºयांविरोधात गुन्हा दाखल केला होता.