भज्जी, रैनाच्या यादीत वरुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:25 IST
भारतीय क्रिकेटपटू वरुण अॅरॉन याने आपली बालमैत्रीण रागिणी हिच्यासोबत जमशेदपूर न्यायालयात सोमवारी विवाह केला.
भज्जी, रैनाच्या यादीत वरुण
भारतीय क्रिकेटपटू वरुण अॅरॉन याने आपली बालमैत्रीण रागिणी हिच्यासोबत जमशेदपूर न्यायालयात सोमवारी विवाह केला.यावेळी त्यांचे कुटुंब व मित्र परिवार उपस्थित होते. येत्या गुरुवारी मोठ्या थाटामाटात ख्रिश्चन रितीरिवाजाप्रमाणे वरुण व रागिणी यांचा विवाह सोहळा चर्चमध्ये होणार आहे.लग्नानिमित्त वरुणने मुंबई विरुद्ध रणजी सामन्यातून माघार घेतली आहे. सुरेश रैना, हरभजन सिंग आणि दिनेश कार्तिक यांच्यानंतर वरुणही विवाह बंधनात अडकला आहे.