अमेरिकेत गायिकेची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 12:34 IST
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओेरलॅँडो शहरात म्युझिकल शोनंतर चाहत्यांना आॅटोग्राफ देताना गायिका क्रिस्टिनावर गोळीबार करुन हत्या करण्यात आली.
अमेरिकेत गायिकेची हत्या
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओेरलॅँडो शहरात म्युझिकल शोनंतर चाहत्यांना आॅटोग्राफ देताना गायिका क्रिस्टिनावर गोळीबार करुन हत्या करण्यात आली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान क्रिस्टिनाचा मृत्यू झाला. हल्लेखोराला क्रिस्टिनाच्या भावाने पकडलं होतं. मात्र, क्रिस्टिनावर गोळी झाडल्यानंतर हल्लेखोराने स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली.२२ वर्षीय क्रिस्टिनावर गोळीबार झाल्यानंतर, तिला जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.पोलिसांनी हल्लेखोराचं नाव जाहीर केलं नाही. मात्र, हल्लेखोराकडे दोन बंदुका होत्या, अशी माहिती मिळते आहे. नेमक हल्ला कोणत्या कारणाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.