ट्विटरने वाढविली 140 कॅरेक्टर मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:20 IST
कंपनीने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्विटरने वाढविली 140 कॅरेक्टर मर्यादा
सगळे सेलिब्रेटी ट्विटर वापरतात. चाहत्यांच्या नावानिशी थेट संवाद साधतात. हे पाहून अनेक जण ट्विटरवर अकाउंट उघडतात.परंतु केवळ 140-कॅरेक्टर्समध्ये आपले म्हणने मांडताना अनेकांना अडचणी येतात. याच कारणाने ट्विटरची यूजरसंख्या दिवसेंदिवस घटू लागली.यावर उपया म्हणून आता कंपनीने मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने आता 140 कॅरेक्टर्सची मर्यादा वाढविली असून ट्विटमध्ये आता लिंक्स, अॅटॅचमेंट्स आणि इतर फीचर अॅड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कंपनीचे प्रोडक्ट मॅनेजर टॉड शेरमन म्हणतात की, गेल्या दशकामध्ये ट्विटरचा व्याप खूप वाढला आहे. 140 कॅरेक्टरच्या साध्या ट्विटपासून ते व्यक्त होण्याचा सर्वात प्रभावशाली व जलद पर्याय म्हणून ट्विटर समोर आले आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार बदल करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. आगामी काही महिन्यांत हे सर्व बदल लागू होतील. तेव्हा मग रिप्लाय ट्विटमध्ये यूजर्सची नावे, फोटो, व्हिडिओ, पोल कॅरेक्टर्समध्ये मोजली जाणार नाहीत. त्यामुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी सोपे जाणार आहे. याबरोबरच कंपनीच्या धोरणांमध्येसुद्धा बदल करण्याचे सुतावेच देण्यात आले आहे.आता कंपनीची ही स्ट्रॅटेजी नवीन यूजर जोडण्यास कितपत यशस्वी ठरते हे तर दिसूनच येईल पण तो पर्यंत ट्विटरचा टिवटिवाट एन्जॉय करूया.