तरुणाईची फोनवरून नजर हटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 20:05 IST
ऐंशीच्या दोन दशकांनंतर जन्मलेली मुलं दिवसातून सरासरी तीन तांसापेक्षा जास्त वेळ मोबाईलचा वापर करतात.
तरुणाईची फोनवरून नजर हटेना
उघड्या डोळ्यांनी जग बघायचे सोडून आजची तरुणाई स्मार्टफोन, टॅब्लेटमध्येच अडकून पडलेली आहे. दिवसाची सुरुवात आणि शेवट फोन पाहूनच करण्याची सवय त्यांना जडली आहे.बरं असे करण्यात सर्वात आघाडीवर आहे या शतकात जन्मलेली पीढी. एका रिर्पोटनुसार ऐंशीच्या दोन दशकांनंतर जन्मलेली मुलं दिवसातून सरासरी तीन तांसापेक्षा जास्त वेळ मोबाईलचा वापर करतात.हे प्रमाण एवढ्या झपाट्याने वाढत आहे की, हे दशक संपण्यापूर्वी हा सरासरी काळ सर्वाधिक असेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबर वेब इंडेक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 18 ते 32 वयोगटातील लोक 3.14 तास प्रतिदिन मोबाईलला चिकटून असतात.2012 मध्ये हेच प्रमाण 1.78 तास, 2014 साली 2.72 तास होते. यावरून यामध्ये होणारी वाढ दिसून येते. इंटरनेटसुविधा असलेल्या इतर स्क्रीनच्या तुलनेत तरुणाई स्मार्टफोनला अधिक प्राधान्य देते.