इमरान हाश्मीच्या हिरोईनवर आली रस्त्यावर राहण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 14:17 IST
फिल्म सिटी म्हणजे ग्लॅमरस जग..एकदा ज्याचे या सृष्टीत पदार्पण झाले त्याच्या आयुष्याला चारचांद लागतात असे म्हणतात,
इमरान हाश्मीच्या हिरोईनवर आली रस्त्यावर राहण्याची वेळ
फिल्म सिटी म्हणजे ग्लॅमरस जग..एकदा ज्याचे या सृष्टीत पदार्पण झाले त्याच्या आयुष्याला चारचांद लागतात असे म्हणतात, मात्र याच जगतात कधी असेही घडते की आपल्या वागण्याने आपले आयुष्य कोणत्या मोडवर येईल हे सांगता येत नाही. असेच काहीसे घडले ते अलिसा खान हिच्याबाबतीत...बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याची हिरोईन म्हणून एका सिनेमात दिसलेली अलिसा खान हिच्यावर सध्या रस्त्यावर राहण्याची वेळ आलीय. दिल्लीच्या ग्रेटर कैलाशच्या रस्त्यांवर अलिसा राहत असल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’मध्ये नुकतच प्रदर्शित करण्यात आले आहे. एक्स बॉयफ्रेंडसोबतचा एक अश्लील व्हिडिओ आॅनलाईन लिक झाल्यानंतर अलिसा हिला तिच्या आप्तेष्टांनी घराबाहेर काढल्याचं सांगण्यात येतंय. आपल्या खाजगी व्हिडिओंना आॅनलाईन प्रदर्शित करणाºया आपल्या एक्स बॉयफें्डविरुद्ध अलिसानं पोलिसांत तक्रारदेखील दाखल केलीय.