सात पाउंड वाचविण्यासाठी केला हजार मैलांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 04:51 IST
सात पाउंड वाचविण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्यामुळे थक्क व्हायची वेळ आली आहे.
सात पाउंड वाचविण्यासाठी केला हजार मैलांचा प्रवास
बचतीचे महत्व नेहमीच सांगितले जाते अनेक जण बचत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. परंतु, ज्या प्रकारे जॉर्डन कॉक्स या ब्लॉगरने सात पाउंड वाचविण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्यामुळे थक्क व्हायची वेळ आली आहे. जॉर्डनला त्याच्या घरी रेल्वेने जाण्यासाठी केवळ साडेतीन तास लागतात. रेल्वेचे तिकीट होते ५१.७९ पाउंड परंतु त्याने तो प्रवास न करता विमानाने प्रवास केला. विमानाचे तिकीट होते ४४ पाउंड. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला १३ तास लागले परंतु त्याचा हट्ट पैसे वाचविण्याचा होता आणि त्याने ते वाचवून दाखवले.जॉर्डन हा ब्लॉगर आहे. तसेच त्याला कुपन किड नावाने ओळखले जाते. जगात कुठली आॅफर आहे आणि त्याबाबत त्याला माहित नाही असे होणारच नाही. किंबहुना ही त्याची पॅशन आहे. घरी जाण्यासाठी त्याने अशीच एक आॅफर शोधून काढली.http://