शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घरात लग्नपत्रिका साठल्या आहेत का? त्या टाकून न देता त्यापासून बनवा हे आकर्षक 5 प्रकार.

By admin | Updated: June 22, 2017 16:49 IST

लग्न पत्रिका फारच सुंदर आहेत त्या टाकून द्यावाशा वाटत नाही. मग कशाला टाकता? या पत्रिकांपासून सुंदर वस्तू तयार करता येतात .

- सारिका पूरकर-गुजराथीलग्नसराई अजूनही सुरु आहे. त्यामुळे घरोघरी सुंदर,आकर्षक लग्नपत्रिका जमा झाल्याच असतील. हल्ली तर अनेकजण लग्नाचं आमंत्रणंही सोशल मीडियावरूनच देताय. पण असं असलं तरी कागदावर आकर्षक मजकूर, गणपती, ढोल-ताशे या सुंदर प्रतिकृतींचा समावेश करुन लग्नपत्रिका आजही छापून घेतल्या जातात. आता तर या छापिल लग्नपत्रिकांचंही रुपडं अधिक सुंदर झालं आहे. नवनवीन डिझाईन्स, वेगवेगळ्या पोताचे कागद यात वापरले जाताहेत. त्यामुळे या पत्रिका खूपच सुंदर दिसू लागल्याय. पण लग्नाची तिथी उलटली की या पत्रिकांचं काय करता तुम्ही? फेकून देता की रद्दीत देता? पण अनेकवेळेस पत्रिका जर खूपच सुंदर आणि आखीव रेखीव असल्या की त्या टाकून द्यायची इच्छा होत नाही. मग नकाच टाकून देऊ आता या पत्रिका. तर या पत्रिकांपासून तयार करा या काही सोप्या हटके गोष्टी. बूकमार्क्स लग्नपत्रिका नेहमीच पाकिटात घालून दिली जाते. या पाकिटाचा फ्लॅप हा कोरा असतो. हा फ्लॅप कापून घ्या. या कागदातून आयताकृती आकार (साधारण बूकमार्कच्या आकाराएवढा) कापून घ्या. फॅन्सी लूक हवा असेल तर आयताच्या चारही कडांवर तिरपे कट द्या. आयताच्या रुंदीच्या एका भागावर मध्यभागी छोटे भोक पाडून घ्या, यात कमी रूंदीची सॅॅटिन रिबन अडकवून टाका. या बूकमार्कवर तुम्ही एखादा छानसा संदेश, एखाद्या पुस्तकातील मोटिव्हेटिव्ह वाक्य, कवितेतील काही ओळी हातानं लिहू शकता. जेणेकरुन यास पर्सनल टच देता येईल. मुलांसाठी तुम्ही कार्टून, जोक्स, स्माईलीज काढू शकता, लिहू शकता. जर तुम्ही एखाद्याला पुस्तक भेट देणार असाल तर हे बूकमार्क त्या गिफ्टला आणखी पर्सनलाईज्ड टच देतं. आणखी एक बूकमार्कची लांबी ही पुस्तकाच्या लांबीपेक्षा किंचित जास्त असू द्या. यामुळे काय होईल, बूकमार्क पुस्तकात ठेवल्यानंतरही त्याचे एक टोक पुस्तकाबाहेर राहील आणि त्यामुळे तुम्ही सहज तुम्हाला हव्या त्या पानावर जाऊ शकाल. एरवी बूकमार्कची लांबी थोडी कमी असते आणि त्यामुळे तो थेट पुस्तकात जाऊन बसतो. त्यामुळे लवकर पान सापडत नाही.

वॉल हॅँगिंग हा तर खूप सोपा पर्याय आहे लग्नपत्रिकांना रियूज करण्याचा. यासाठी किंचित जास्त लांब असलेलं कार्ड घ्या. ज्या बाजूवर मजकूर नसेल त्या बाजूवर वरुन एक-दोन सेंमी जागा सोडून भोक पाडून घ्या. याखाली पुन्हा दोन सेंमी जागा सोडून तुम्हाला आवडलेल्या कवितेच्या, एखाद्या पुस्तकातील परिच्छेदातील काही ओळी कॅलिग्राफी करुन लिहून घ्या. हा छानसा संदेश भिंतीवर टांगा. जोडीला तुम्ही त्या लेखकाचा फोटोही जोडू शकता.

 

गिफ्ट टॅग आपण एखाद्याला भेटवस्तू देतो तेव्हा ती आकर्षक गिफ्ट रॅपिंग पेपरमध्ये पॅॅक करुन आणि त्यावर बेस्ट कॉम्प्लिेमेंटचं स्टिकर लावून आणि त्यावर आपलं नाव टाकून देतो. हे तेच तेच स्टिकर लावण्याऐवजी काहीतरी हटके तुम्हाला करता येईल. त्याकरिता या पत्रिकांचा वापर करा. पत्रिकेच्या कागदातून ५ सेंमी बाय ५ सेंमी किंवा ५ बाय ७ सेंमी आकाराचे चौकोन, आयताकार कापून घ्या. त्याच्या कडांना गोलाकार, तिरपे छेद द्या. जेणेकरुन फॅन्सी लूक येईल. या तुकड्यांवर डाव्या बाजूला सोनेरी, कॉपर थ्री डी आऊटलाईनरनं सुंदर नक्षी रेखाटा. आणि बाजूला एखादा संदेश लिहा. यातून एकदम पर्सनलाईज्ड गिफ्ट टॅग तयार होतो.

 

         

फोटो फ्रेम जुन्या लग्नपत्रिकांमधून काही आकर्षक रंगांचे, डिझाईन्सचे कागद बाजूला काढून घ्या. तुमच्याकडील फोटोफ्रेमच्या कडांवर ते योग्यपद्धतीनं चिकटवून टाका. यामुळे फोटो फ्रेमला इको फ्रेंडली लूक येईल. लग्नपत्रिका जर जाडजूड, मोठ्या आकारातील असेल तर थेट त्यावरच तुमच्याकडील एखादा फोटो चिकटवा. आजूबाजूला रेडिमेड कृत्रिम फुलं-पानं लावून सजवा.

 

        कोलाजविविध लग्नपत्रिकांमधून छोटे-मोठे चौकोनी-आयताकार आकार कापून घ्या. एका मोठ्या हार्डबोर्डवर हे आकार सुंदर रचना करुन चिकटवा. त्यासाठी मॉड पॉज ग्लूचा वापर करा. हा कोलाज दिसायला सुंदर तर दिसेलच शिवाय घरच्या घरी भिंतीवर टांगण्यासाठी सुंदर सहज आणि स्वस्त आर्ट पीस तयार होईल. याच लग्नपत्रिकांमधून हार्ट शेप, प्राणी-पक्ष्यांचे आकार, गोलाकार कापूनही हाच कोलाज तयार होऊ शकतो. योग्य रंगसंगती फॉलो करा म्हणजे झालं.