तेजश्री आता हिंदी नाटकात झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 21:50 IST
‘होणार मी सून या घरची’ या लोक प्रिय मालिकेत भूमिका करीत असतानाच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला ‘कार्टी नाटकात घुसली’ या मराठी नाटकासाठी विचारणा झाली होतीे. या नाटकात काम केल्यानंतर तिच्या कामाचं बरेच कौतुक झालं.
तेजश्री आता हिंदी नाटकात झळकणार
‘होणार मी सून या घरची’ या लोक प्रिय मालिकेत भूमिका करीत असतानाच अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला ‘कार्टी नाटकात घुसली’ या मराठी नाटकासाठी विचारणा झाली होतीे. या नाटकात काम केल्यानंतर तिच्या कामाचं बरेच कौतुक झालं. आता मराठी नाटकानंतर तेजश्री हिंदी नाटकातही दिसणार आहे. शर्मन जोशी निर्मित ‘मै और तु’ या नाटकात तेजश्री शर्मन सोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या बरोबरच तेजश्री एका मराठी चित्रपटाचेही शूटिंग करीत आहे. त्यामुळे नाटक, सिनेमा या दोन्ही गोष्टी हॅण्डल करता करता तेजश्रीची चांगलीच दमछाक होत आहे.