TECH : चोरी तर दूरच आता तुमच्या स्मार्टफोनला कोणीही हात लावला तरी पकडला जाईल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2017 17:46 IST
थोड्याशा दुर्लक्षाने आपला स्मार्टफोन चोरीला जाऊ शकतो. या धक्कयापासून वाचण्यासाठी काही खास टिप्स...
TECH : चोरी तर दूरच आता तुमच्या स्मार्टफोनला कोणीही हात लावला तरी पकडला जाईल !
-Ravindra Moreआज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. एवढा महागडा स्मार्टफोन जर चोरीला गेला तर मोठा धक्काच बसतो. बहुतेकजण आपला फोन चोरीला जाऊ नये म्हणून प्रवासात, घरात, बाहेर फिरताना नेहमी काळजी घेतात. मात्र थोड्याशा दुर्लक्षाने आपला स्मार्टफोन चोरीला जाऊ शकतो. या धक्कयापासून वाचण्यासाठी आम्ही आपणास काही खास टिप्स देत आहोत. * प्ले स्टोअर मध्ये एक चांगल्या रेटिंगचे ‘अॅन्टी थेप्ट अलार्म’ अॅप उपलब्ध असून त्या अॅपला सर्वप्रथम डाउनलोड करा. * अॅप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा.* ओपन केल्यानंतर ‘टर्म्स अॅँड कंडिशन्स’ च्या खालील बाजूस ‘ओके’ वर क्लिक करा.* ओकेवर क्लिक केल्यानंतर आपणास स्क्रिनवर ‘चार्जर डिटेक्शन मोड’, ‘मोशन डिटेक्शन मोड’, ‘प्रोक्झिमिटी डिटेक्शन मोड’ आणि सिम डिटेक्शन मोड’ असे चार पर्याय दिसतीत.* याचा अर्थ असा की, पहिल्या पर्यायानुसार जर आपला मोबाइल चार्जिंगला लावला असेल आणि अॅन्टी थेफ्ट अलार्म अॅक्टिव केला असेल तर जसाही आपला मोबाइल चार्जिंगपासून डिस्कनेक्ट केला जाईल तसा लगेच जोराने अलार्म वाजेल, म्हणजेच आपण मोबाइलपासून जरी लांब असू तरी आपल्याला समजेल की, आपल्या मोबाइलला कोणीतरी हात लावला आहे. यासारखेच इतर पर्यायांवर अलार्म अॅक्टिव केल्यास तुमचा मोबाइल एखाद्या ठिकाणी, खिशात ठेवला आणि कोणीही मोबाइलला घेण्याचा प्रयत्न केला तरी मोठा अलार्म वाजेल आणि आपर्ण सतर्क होऊ शकतो. याशिवाय चौथा पर्याय म्हणजे सिम डिटेक्शन मोड अॅक्टिव्ह केल्यास आपल्या मोबाइलमध्ये एखाद्याने आपले सिम काढून दुसरे सिम टाकण्याचा प्रयत्न केला तरीही अलार्म वाजेल आणि आपण सतर्क होऊ शकतो. * अलार्म कसा अॅक्टिव कराल?अलार्म अॅक्टिव करण्यासाठी संबंधीत पर्यायावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपणास ‘सिलेक्ट पिन’ किंवा ‘पॅटर्न फॉर पासवर्ड’ असे विचारण्यात येईल. आपल्या इच्छेनुसार आपण पिन किंवा पॅटर्न सिलेक्ट करु शकता. पिन किंवा पॅटर्न सिलेक्ट केल्यानंतर आपण अलार्म अॅक्टिव करू शकता आणि आपला स्मार्टफोन चोरी होण्यापासून वाचवू शकता.