TECH : अवघ्या ३० मिनिटात करा स्मार्टफोनची बॅटरी पूर्ण चार्ज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:43 IST
ऐन महत्त्वाच्या वेळी फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली की तो फोन कितीही महागडा असेल तर काहीच कामाचा नसतो.
TECH : अवघ्या ३० मिनिटात करा स्मार्टफोनची बॅटरी पूर्ण चार्ज !
स्मार्टफोन म्हटले की त्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे बॅटरीची चार्जिंग संपणे. या समस्येने बहुतांश लोक त्रस्त आहेत. ऐन महत्त्वाच्या वेळी फोनची बॅटरी डिस्चार्ज झाली की तो फोन कितीही महागडा असेल तर काहीच कामाचा नसतो. नेमकी हिच निकड ओळखून एका कंपनीने ‘सुपर एमचार्ज’ ही प्रणाली सादर केली आहे. या प्रणालीच्या मदतीने अवघ्या ३० मिनिटात स्मार्टफोनची पूर्ण बॅटरी चार्ज करणे शक्य आहे. या चिनी कंपनीने ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये आपली ‘सुपर एमचार्ज’ ही प्रणाली जगासमोर सादर केली आहे. ही याच कंपनीच्या ‘एमचार्ज’ची अद्यायवत आवृत्ती असून ती ‘क्विक चार्ज ३.०’ व ‘व्हिओओसी चार्ज’ या प्रणालींपेक्षा अधिक गतीमान असल्याचा दावा या कंपनीतर्फे करण्यात आला आहे. याच्या मदतीने ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी अवघ्या ३० मिनिटांमध्ये पूर्णपणे चार्ज करता येते. शिवाय चार्जिंग सुरू असतांना बॅटरी गरम होऊ नये याची खास काळजी घेण्यात आली आहे.