शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

TECH : ​आपल्या स्मार्टफोनमध्ये ‘व्हायरस’ आहे हे कसे ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 15:32 IST

अ‍ॅपलच्या तुलनेने अ‍ँड्रॉइडमध्ये व्हायरस लवकर येतात. काही अशा टिक्स आहेत, ज्याद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस आहेत की नाही हे ओळखले जाऊ शकते.

‘अ‍ँड्रॉइड’ ही जगभरात सर्वात जास्त वापरण्यात येणारी आॅपरेटिंग सिस्टम आहे. संपूर्ण जगात सुमारे १ अरबपेक्षाही जास्त अ‍ँड्रॉइड वापरकर्ते आहेत. या वापरकर्त्यांना आपल्या जाळ्यात फसविण्यासाठी हॅकर्स नवनवीन ट्रिक्सचा वापर करीत आहेत. हॅकर्स स्मार्टफोनधारकांना विशिष्ट अ‍ॅप डाउनलोड करण्यास प्रवृत्त करतात आणि त्याद्वारे संपूर्ण माहिती चोरुन घेतात. विशेष म्हणजे अ‍ॅपलच्या तुलनेने अ‍ँड्रॉइडमध्ये व्हायरस लवकर येतात. काही अशा टिक्स आहेत, ज्याद्वारे आपल्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस आहेत की नाही हे ओळखले जाऊ शकते. * जास्त बॅटरी खर्च होणेव्हायरसने फक्त आपल्या मोबाइलचा डाटाच खर्च होत नाही तर मोबाइलच्या बॅटरीवरदेखील याचा परिणाम होतो. जर आपण व्हायरसयुक्त अ‍ॅप डाउनलोड केले तर आपल्या मोबाइलची बॅटरी वेगाने खर्च होते. * अनावश्यक अ‍ॅपकाही असे अ‍ॅप असतात जे नकळत आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल होतात. ट्रोजन मॅलवेयरद्वारा मोबाइलसाठी हे अ‍ॅप्स आपल्या मोबाइलमध्ये आॅटोमेटिक डाउनलोड होतात.   * डाटा जास्त खर्च होणे जर अचानक आपल्या मोबाइलचा डाटा जास्त खर्च होऊ लागला असेल तर आपल्या मोबाइलमध्ये व्हायरस आहेत असे समजावे. जर गेल्या महिन्याच्या तुलनेने आपला डाटा अचानक विना वापर करता जास्त खर्च झाला तर आपल्या मोबाइल किंवा टॅबमध्ये व्हायरस शिरल्याचा संकेत आहे. * एक्स्ट्रा चार्जजर आपल्या मोबाइल बिलामध्ये अनावश्यक एक्स्ट्रा चार्ज आकारण्यात येत असेल तर हे देखील व्हायरस असल्याचे कारण आहे. अशावेळी आपल्या मोबाइलमध्ये प्रीमियम रेट नंबर्सवर टेक्स्ट मॅसेज पाठविले जातात आणि आपणाकडून याचे पैसे आकारले जातात. प्रीमियम रेट नंबर एक विशिष्ट प्रकारचा नंबर असतो ज्यावर मॅसेज पाठविण्याचे चार्जेस सामान्य मॅसेजच्या तुलनेने जास्त असतात. * अचानक येणारे पॉप-अ‍ॅप्सजर आपण पॉप-अ‍ॅप्स, नोटिफिकेशन्स, अनावश्यक रिमायंडर आणि सिस्टम वॉर्निंग सारखे नोटिफिकेशन्सवर क्लिक करीत असाल तर याद्वारेदेखील डिव्हाइसमध्ये व्हायरस वाढू शकतात. * व्हायरसपासून कशी मिळवाल सुटकाजर आपला मोबाइल व्हायरसच्या कारणाने स्लो काम करत असेल तर डिवाइसला क्लिन करण्यासाठी काही टिप्स फॉलो करु शकतात. * संदिग्ध अ‍ॅप डिलीट करायाप्रकारचे अ‍ॅप डिलीट करण्यासाठी सेटिंग्समध्ये जावे. त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन मॅनेजरवर जाऊन क्लिक करावे. ज्या अ‍ॅपला डिलीट करायचे आहे, त्यावर टॅप करावे. असे केल्याने त्या अ‍ॅपची माहिती खुलेल. सर्वात अगोदर त्या अ‍ॅपचे कॅश क्लियर करावे आणि त्यानंतर अ‍ॅपचा डाटा क्लियर करण्यासाठी क्लियर डाटावर टॅप करावे. हे सर्व केल्यानंतर अनइन्स्टॉल बटनवर क्लिक करुन अ‍ॅप रिमूव्ह करावे.  Also Read : ​ फॉर्मेट न करता फोनमधून काढा व्हायरस!