शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी रबरी चपला घेताय? सावधान..

By admin | Updated: May 30, 2017 17:04 IST

पावसाळ्यात रबरी चपला वापरणाऱ्यांच्या पायाला धोका!

- नितांत महाजनपावसाळा जवळ आला की आपण सालाबादाप्रमाणे एक खरेदी नक्की करतो. पावसाळी बूट किंवा चपला. त्यातही रंगबिरंगी पावसाळी चपला तर सर्वत्र दिसतात. आता तर काय त्यात अनेक डिझाईन्स, फॅशन्स, रंग उपलब्ध असल्यानं पावसाळी रबरी चपला हा बोअर प्रकार वाटत नाही. पूर्वी फक्त काळ्या किंवा तांबड्या चपला उपलब्ध असत तसंही आता काही उरलेलं नाही. पण या रबरी चपला आपण जितक्या सहज घेतो, स्वस्तात स्वस्त. रोड साईड खरेदी करतो. स्वत:ला समजावतोही की, दोन-तीन महिने तर वापरायच्यात, कशाला खर्च करा? आणि मग त्या रबरी चपलांचे दोन-तीन जोडही घेणारे अनेकजण दिसतात. पण खरंच या चपला पायांसाठी बऱ्या आहेत? की या रबरी चपलांमुळे पायांना दुखापत होवू शकते?पण आपल्याकडे पावसाळ्यात बहुसंख्य लोक त्या रबरी चपलाच वापरतात. त्या चटकन धुता येतात. त्यांचे रंग बरे असतात. त्यामुळे काही हौशी पावसाळ्यात मॅचिंग चपलाही घालतात.माथ हफपोस्ट या वृत्तसंस्थेनं शिकागोच्या एका डॉक्टरांचा एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. हे डॉक्टर पोडियाट्रिस्ट आहेत. म्हणजे असे तज्ज्ञ डॉक्टर जे पायांच्या मुख्यत्वे पाऊलांच्या आजारांचे तज्ज्ञ आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, पावसाळ्यातच काय पण कधीही रबरी चपला वापरणं हे पायांसाठी घातकच आहे. या रबरी चपला पायांत घातल्यावर त्रासदायक वाटत नाहीत पण त्यांच्या हील्सना सपोर्ट नसतो, त्यामुळे टाचांना सपोर्ट मिळत नाहीत. आणि म्हणून स्लीपरने घसरण्याचा, पाय वेडावाकडा पडण्याचा आणि चालताना पावलाला त्रास होण्याचा जितका धोका असतो तितकाच या रबरी चपलांचाही असतो. आपल्याकडच्या पावसांत, रस्त्यावरच्या चिखलांत, आणि गाळाच्या राबडीत आपण या रबरी चपला घालून चालतो तेव्हा पायांनाच नाही तर आपल्यालाही धोका आहे हे लक्षात ठेवलेलं बरं.

 

रबरी चपला का वाईट?१) तुम्ही रबरी चपला पायात घालतात, पण त्या पायांना सपोर्ट करत नाहीत. तर पाय त्यांना पकडून ठेवतात. त्यांना सपोर्ट कमी असतो त्यामुळे त्या पायात घालून ठेवण्यासाठी आपोआप तुमचे पावलांचे मसल टाईट होतात आणि त्या चपलांना धरुन ठेवण्यासाठी बळ लावतात. त्यानं पावलांच्या मसल्सवर अनाठायी ताण येतो. दिवसभर अशा चपला घातल्यानं रात्री पाऊलं, टाचा दुखू शकतात.२) अगदी थोडं चालायचं आहे तर या चपला ठीक, पण रोज १० मिनिटांपेक्षा अधिक चालणाऱ्यांना रबरी चपला टाळलेल्याच बऱ्या.३) पायांना चालताना चांगला सपोर्ट मिळाला नाही तर बोटं, टाचा दुखतात.तशी वेदना असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, आधी रबरी, प्लास्टिकच्या चपला वापरणं बंद करा.४) ज्या चपलांना मागून बंद नाहीत, अशा चपला, सॅण्डल्स वापरू नका. त्यानं पायाला ग्रिप येत नाही.५) पावसाळ्यातली चप्पल खरेदी ही अधिक जबाबदारीनं आणि पायाला आराम देईल अशी असावी फक्त स्वस्त तेच मस्त असं समजून स्ट्रिट शॉपिंग करू नये.