आपल्या आयुष्यातील ‘सुपरमॅन’ आपला बाप - सिद्धार्थ जाधव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 11:36 IST
आपण ज्यांच्यामुळे आहोत; त्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. आयुष्यात असे काही तरी करून दाखवा, ज्यामुळे तुमच्या आई-वडिलांच्या चेहºयावर एक प्रकारचे समाधान असेल. हे जेव्हा घडेल; तेव्हा जगातील अशक्य गोष्टही तुमच्या पायाखाली येईल.
आपल्या आयुष्यातील ‘सुपरमॅन’ आपला बाप - सिद्धार्थ जाधव
आपण ज्यांच्यामुळे आहोत; त्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. आयुष्यात असे काही तरी करून दाखवा, ज्यामुळे तुमच्या आई-वडिलांच्या चेहºयावर एक प्रकारचे समाधान असेल. हे जेव्हा घडेल; तेव्हा जगातील अशक्य गोष्टही तुमच्या पायाखाली येईल. आपल्या इच्छा-आकांशा पूर्ण करण्यासाठी ते पदोपदी झटत असतात, याचे भान ठेवा. आपल्या आयुष्यातील खरा सुपरमॅन आपला बापच असतो, असे भावनिक आवाहन जळगावातील तरुणाईला मराठी सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव याने केले.मू.जे. महाविद्यालयाच्या वतीने ‘कार्निवल २०१६’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सायंकाळी ७ वाजता ए.टी. झांबरे विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तरुणाईशी संवाद साधतांना सिद्धार्थ जाधव बोलत होता. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, केसीई सोसायटीचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी, सामाजिक कार्यकर्ते नरेश खंडेलवाल, प्रा.अस्मिता पाटील, दिलीप चौबे, अॅड.संजय राणे, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शीतल ओसवाल उपस्थित होते. प्रास्ताविक चंद्रकांत भंडारी यांनी केले. नटराज पूजनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मनात न्यूनगंड बाळगू नकातरूण वयात आपण नेहमी दुसºयाचे अनुकरण करतो. त्यातून मनात न्यूनगंड निर्माण होतो. आयुष्यात स्वत:वर विश्वास ठेवा, प्रेम करा; स्वत:चे कौशल्य ओळखा, जग आपोआपच तुमच्यावर प्रेम करेल. हे सारे माझ्यासोबतही घडले आहे. मी हे केले; म्हणून अख्खा महाराष्टÑ माझ्यावर प्रेम करतो, असेही तो म्हणाला.‘बसणे’ म्हणजे आपले आयुष्य बसवण्यासारखेचसिद्धार्थ जाधव राज्याच्या व्यसनमुक्ती मोहिमेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असल्याने त्याने विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मनात न्यूनगंड आला की, आपण व्यसनांच्या आहारी जातो. चला, आज बसूया, असे म्हणून काही जण मद्यसेवन करतात. पण हे बसणे म्हणजे आपले आयुष्य बसवण्यासारखेच असते. ज्यावेळी एखाद्या पित्याचा मुलगा व्यसनाने मृत्यू पावतो. तेव्हा तो पिताही त्याच दिवशी मृत्यू पावलेला असतो. आई-वडील आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात. मात्र, ते कधीही व्यक्त होत नाहीत. व्यसनामुळे त्यांच्या आधी जगाचा निरोप घेण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही. तरीही जगाचा निरोपच घेत असाल तर असे काम करून जा, ज्यामुळे तुमच्या आई-वडिलांना तुमच्यावर गर्व होईल, असे आवाहन जाधवने केले.सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले.photo : Sumit Deshmukh