‘बेवॉच’ लावण्यवतींचा सूपर हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 18:33 IST
अलेक्झांड्रा डॅडारियोने इतर बेवॉच सहकाऱ्यांसोबत सुपरहॉट ट्विटरवर शेअर केला आहे.
‘बेवॉच’ लावण्यवतींचा सूपर हॉट फोटो
समुद्रकिनारी असणाऱ्या लाईफगार्ड्सच्या दैनंदिन जीवनावर आधारित ‘बेवॉच’ मालिकेचे जगभर चाहते आहेत. नव्वदच्या दशकात सर्व तरुणांना भूरळ घातलेल्या या मालिकेवर चित्रपट तयार होत आहे म्हटल्यावर संपूर्ण चाहत्यांना त्याची उत्सुकता लागलेली आहे.‘बेवॉच मुव्ही’विषयी छोटीमोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. नुकतेच चित्रपटातील प्रमुख कलाकारांचा आॅफिशियल फोटो लाँच करण्यात आला. झॅक अफ्रॉननेदेखील त्याच्या पीळदार शरीराचे आॅन सेट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ते पाहून जर तुम्ही खूश झाला असाल तुमच्यासाठी आणखी एक खूश खबर आहे.चित्रपटात सहकलाकार असलेल्या अलेक्झांड्रा डॅडारियोने इतर बेवॉच सहकाऱ्यांसोबत सुपरहॉट ट्विटरवर शेअर केला आहे. सेटवर घेतलेल्या या फोटोत अलेक्झांड्रासह या फोटोत केली रोहर्बाक आणि लिफेनेश हेडेरा आहेत. }}}}पुढील वर्षी 19 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आपली ‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडा मुख्य भूमिकेत असून ड्वेन जॉन्सन (द रॉक), झॅक अफ्रॉन तिचे सहकलाकर आहेत. आता प्रियंकाचा 'बेवॉच' लूक कधी दिसतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. आम्ही वाट पाहतोय प्रियंका!!