बॅकपॅकचा स्टाईलिश अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 02:12 IST
‘हर्शेल’ ब्रँडच्या लिंडन कॉरमॅकने नवीन पद्धतीचे ‘अपेक्सनीट’ नावाचे मटेरिअल विकसित केले आहे.
बॅकपॅकचा स्टाईलिश अंदाज
फुटवेअर आणि कपड्यांची नवनवीन स्टाईल बाजारात येत असते. मात्र, लगेज बॅगच्या बाबतीत तितकेसे इनोव्हेशन पाहायला मिळत नाही. लेदर, कॅनव्हास, नायलॉन हे बॅग तयार करण्याची ठरलेले मटेरिअल. यालाच पर्याय म्हणून आता ‘हर्शेल’ ब्रँडच्या लिंडन कॉरमॅकने नवीन पद्धतीचे ‘अपेक्सनीट’ नावाचे मटेरिअल विकसित केले आहे.दोन वर्षाच्या मेहनतीने अपेक्सनीट तयार करण्यात आले. त्याची खासियत म्हणजे कोणत्याही आकारात त्याला मोल्ड करता येते. इतर बॅग्सच्या तुलनेत अपेक्सनीट बॅगचे वजन ४० टक्क्यांनी कमी असते. इतर मटेरिअलपासून बॅग तयार करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मटेरिअल वाया जाते. मात्र अपेक्सनीट साच्यामध्ये आकार घेत असल्यामुळे वेस्टेज कमी होऊन ते आर्थिकदृष्ट्यादेखील खूप फायद्याचे आहे.’अपेक्सनीट बनविण्या मागची प्रेरणा स्पष्ट करताना लिंडनने सांगितले की, ‘आॅफिस असो शाळा, आज आपण सतत प्रवास करत असतो. प्रवासात कमफर्टेबल आणि वजनाने कमी असलेली बॅग तयार करण्याचा माझा ध्यास होता. नाईके (फ्लायनीट) आणि आदिदास (प्राईमनीट) यांसारख्या बड्या कंपन्या विणवलेल्या कापडापासून शूज फुटवेअर तयार करतात. तेथूनच मला अपेक्सनीटची कल्पना सुचली.