फॅशनमध्ये आघाडीवर राहण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 18:27 IST
गर्दीमध्ये उठून दिसण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही काही तरी वेगळे परिधान करणे.
फॅशनमध्ये आघाडीवर राहण्यासाठी
आजच्या नवीन विचारांबरोबरच नवीन फॅशनही आली आहे. मात्र काही असे ट्रेंड आहेत जे काही वर्षांपासून चालत आले आहेत. काही लोक याला आज ही फॉलो करतात. जे खूपच आउट आॅफ ट्रेंड झाले आहेत. यामुळे फॅशनमध्ये ते मागे राहिले जातात. जाणून घ्या अशाच काही फॅशन मिस्टेक्स आणि यावर उपाय...► ब्राईट कलर्स : दोन ब्राईट रंग एकत्र परिधान करणे हे थोडे वेगळेच वाटते. मात्र तुम्ही याला इंटरेस्टिंग करू शकता. संपूर्ण आउटफिटला योग्य अॅक्सेसरीजने कंप्लीट करा.► हाय हिल्स : हाय हिल्स तुमच्या लुकमध्ये अजूनच भर घालते. तुम्ही उंच असाल तर असा विचार नका करू की, हे आपल्यासाठी नाही. पायाला सुंदर लुक देत असते.► मोठ्या प्रिंट्स : गर्दीमध्ये उठून दिसण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही काही तरी वेगळे परिधान करणे. हे काम हॉरिजॉन्टल, स्पोटिंग आणि मोठ्या प्रिंट्स सहज करतात. ► मॅक्सी ड्रेस : आपली उंची कमी आहे. यामुळे मॅक्सी आणि मोठे ड्रेस आपल्यासाठी नाहीत. परंतु तुम्ही योग्य हाय हिल्सचा वापर करुन परफेक्ट ड्रेसची निवड करू शकता.► डेनिमबरोबर डेनिम : डेनिमचे विशेष म्हणजे ही कधीच आउट आॅफ फॅशन होत नाही. तसेच याच्या वापराची काही बंधनेही नसतात. मात्र यावर योग्य फुटवेअरचा वापर आवश्यक आहे.