ऑफिसमध्ये होणार आता स्टँडिंग वर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:11 IST
अनेक कर्मचार्यांची एक कॉमन तक्रार असते की बैठे कामामुळे त्रास पाठीचा त्रास होतो.
ऑफिसमध्ये होणार आता स्टँडिंग वर्क
अनेक कर्मचार्यांची एक कॉमन तक्रार असते की बैठे कामामुळे त्रास पाठीचा त्रास होतो. त्यामुळे आता काही ऑफिसेसमध्ये उभे राहून काम करण्याची नवीनच पद्धत सुरू झाली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका अध्ययनातून असे दिसून आले, की जर तुम्ही नियमित व्यायाम केला तर बसल्यामुळे आरोग्यावर कोणताच वाईट परिणाम होत नाही. यामुळे एका प्रकारे यूके नॅशनल हेल्थ सर्विसच्या (एएचएस) दाव्याला आव्हान मिळाले आहे. 'एनएचएस'ने दावा केला होता जास्त काळ बसल्यामुळे आरोग्य खालावते, मग तुम्ही कितीही व्यायाम करा त्याचा काही फायदा होत नाही. परंतु एक्सटर विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी या ५ हजार लोकांचा गेली १६ वर्षे अभ्यास करून दावा केला की नियमित व्यायामाने जास्त काळ बसल्यानंतरही कसलेच दूष्परिणाम होत नाही. त्यांचे हे संशोधन त्यांनी इंटरनॅशनल 'र्जनल ऑफ एपिडेमीओलॉजी'मध्ये प्रकाशित केले आहे. 'जास्त वेळ एकाच पोजिशनमध्ये बसणे आरोग्यासाठी घातक असते मात्र नियमित व्यायाम केला तर काही फरक पडत नाही.