स्पृहा जोशी नाही खेळणार रंगपंचमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 21:34 IST
रंगाची उधळण करण्यासाठी प्रत्येकजण होळी सणाची आतुरतेने वाट पाहत असतात.......
स्पृहा जोशी नाही खेळणार रंगपंचमी
रंगाची उधळण करण्यासाठी प्रत्येकजण होळी सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. यादिवशी विशेषत: सेलिबे्रटींची मोठी धूम असते. आणि यात मराठी सेलिब्रेटीही मागे नाहीत. मराठी सेलिब्रेटींनी आपल्या चाहत्यांना या रंगीबेरंगी सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. अभितेत्री स्पृहा जोशीने होळीच्या शुभेच्छा देताना यावर्षी रंगपंचमी साजरी करणार नसल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पृहाने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देताना लिहिले, ‘होळीच्या अनंत शुभेच्छा....यंदा रंगपंचमी साजरी करणार नाही.’ so wishing all of a happy holi, digitaly may your life be filled with colors...सर्वत्र दुष्काळ पडल्याने अनेक मराठी कलाकारांनी यावर्षी रंगपंचमी साजरी करणार नाहीत. अभिनेता स्वप्नील जोशी सुद्धा यंदा रंगपंचमी साजरी करणार नाही.