मोहिनी घारपुरे-देशमुखसाडी या एकाच प्रकाराविषयी बोलायचं म्हटलं तरी एक स्वतंत्र लेखमाला चालवता येऊ शकते. परंतु एकेका प्रकारच्या साड्यांची क्रेझ असण्याचा एक एक सीझन असतो. सध्या बाजारात हॅण्डलूम साड्यांची फारच चलती आहे. अशाही या साड्या बहुतेक प्रत्येकीलाच शोभून दिसतात. तसंच या साड्यांचा एक वेगळाच डौल, एक वेगळीच नझाकत असते म्हणूनच तर प्रत्येक राज्यातील विशिष्ट प्रकारच्या हॅण्डलूम साड्यांना त्या विशिष्ट राज्यात विशेष मागणी असते.
खरंतर हॅण्डलूम साड्यांसाठी प्रचंड मेहनत, कलाकुसर केली जात असल्यानं एकेका साडीची किंमत अक्षरश: लाखो रूपयांपर्यंतही असू शकते; पण ग्रेसफुल दिसायचं असेल आणि या साड्या घेणं परवडणारं असेल तर या साड्यांना कुठे तोडच नाही. बाजारात अलिकडे हॅण्डलूम साड्यांचे बरेच प्रकार आहेत. बनारसी, रेशमी, कॉटन, उपाडा सिल्क, बांधणी, जूट सिल्क, मॉश्चराइज सिल्क असे कित्येक प्रकार या हँडलूम साड्यांमध्ये आहेत आणि या प्रत्येक प्रकाराला आपली स्वत:ची अशी एक खास शैली आहे, एक खास ग्रेस आहे. या प्रत्येक साडीसाठी प्रचंड मेहनत आणि कलाकुसर केली जाते. कतान सिल्क प्रकारातील साडी. एक साडी तयार करताना एका वेळी 3 कारागिरांनी 14 सुयांपासून ही साडी विणली. ही साडी तयार करायला त्यांना तब्बल 3 महिन्यांचा अवधी लागला. बाजारात जेव्हा ही साडी विक्रीसाठी आली तेव्हा तिची किंमत तब्बल 1 लाख 22 हजार रूपये एवढी होती. एवढ्या किंमतीमागची मेहनतही जबरी आहे. अर्थातच हॅण्डलूम साड्या या फॅशन जगतात कायमच इन रहातील यात दुमत नाही. कोणत्याही सण समारंभाला, उत्सवाच्या प्रसंगी आपल्यातला ‘अॅस्थेटीक सेन्स दाखवायचा असेल तर या साड्यांनाच पहिली पसंती द्यायला हवी.
हॅण्डलूम साड्या परिधान करताना..* हॅण्डलूम साड्या लग्न समारंभाबरोबरच एखाद्या कार्यक्र माला, उद्घाटनसोहळ्याप्रसंगी वगैरे नेसल्या तर फारच आकर्षक लूक येतो* या साड्यांबरोबर आभुषणांची निवड करताना मात्र शक्यतो टेराकोटा ज्वेलरी किंवा धानाचे कानातले, गळ्यातले घालावेत ते जास्त शोभून दिसतात* पारंपरिक दागिने ते ही एकाच धातूमधले असतील तर ते मात्र शक्यतो अशा साड्यांबरोबर घालू नयेत त्यामुळे साडीबरोबरचा लूक उठून दिसत नाही. * फ्लॅट चप्पल ऐवजी सँडल्स किंवा नॉर्मल हिल्सवाल्या चप्पल घालून जास्त ऐटबाज दिसता येईल. *सोबत अगदी खणाची पर्स वगैरे कॅरी केलीत तर उत्तम.