मुलांना दररोज सांगा या काही बाबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 15:44 IST
आपण जे बोलू, वागू ते तसेच वर्तन करत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर या पुढील बाबी नेहमी बोला :
मुलांना दररोज सांगा या काही बाबी
पालक नेहमीच आपल्या पाल्यांना सक्ती करत असतात. पण, तुम्हाला असे वाटते का की, मुलांना शिक्षा करून तुम्ही चांगले पालक होऊ शकता. तर तुम्ही चुकीची समज बाळगून आहात.खरंतर, मुलांच्या विकासासाठी काही गोष्टी त्याला आपण सतत सांगितल्या पाहिजेत. लहान मुलांचे मन हे अत्यंत कोमल असते. त्याच्यासमोर आपण जे बोलू, वागू ते तसेच वर्तन करत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर या पुढील बाबी नेहमी बोला : 1. आम्हाला तुझा अभिमान तुमचे पाल्य खेळात किंवा अभ्यासात नंबर वन असेल तरच त्याला आम्हाला तुझा अभिमान आहे, असे म्हणण्याची गरज नाही. इतर वेळेसही तुम्ही त्याला ‘आम्हाला तुझा अभिमान’ आहे, असे म्हणू शकता. त्यामुळे मुलांना एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते.2. तुझ्यावर आमचे प्रेम आहेदररोज मुलाला सांगा की, आमचे तुझ्यावर खुप पे्रम आहे. तो किंवा ती कितीही रागात असली तरीही ते तुमचं नक्की ऐकतील. आणि रात्री झोपताना तुम्हाला मिठी मारूनच झोपतील.3. तुझ्यावर विश्वास शाळेत मुलं शिकत असतील तर त्याला अव्वल राहण्यासाठी पालकच प्रेशर टाकतात. पण प्रत्येक जण काही नंबर वन येऊ शकत नाही. तुम्ही त्याला फक्त असे म्हणा की, तुमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा त्याला खुप प्रोत्साहन मिळते.4. तुझे मत आमच्यासाठी महत्त्वाचे तुमच्या मुलाला विश्वास द्या की, तुमच्यासाठी त्याचे मत किती गरजेचे आहे. त्याच्यासोबत चर्चा करूनच एखादा निर्णय घेतला पाहिजे. त्याला काय वाटते हेदेखील तुमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे हे कळू द्या.5. अपयशी ठरलास तरी यश मिळेलचयश हे काही फक्त यश मिळण्यातच आहे असे नाही तर तुला अपयश येईल तरी तु त्यातून शिकायला हवेस. तु जेवढी मेहनत घेतलीस ती तुझ्या कामालाच येणार आहे, असे त्याला सांगा.