शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

​नितळ, निरोगी व मुलायम त्वचेसाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 23:41 IST

जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात.

जसे वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकूत्या दिसू लागतात आणि वृद्ध होत असल्याची चिन्ह आपणास जाणवतात. मात्र वृद्ध होणे कोणालाच आवडत नसल्याने आपली त्वचा नितळ, निरोगी, मुलायम व तकाकीयुक्त दिसण्यासाठी प्रत्येकजण कसोसीने प्रयत्न करताना दिसतात. आजच्या लेखात आपण नितळ व निरोगी त्वचेसाठी व तारुण्यता टिकविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत हे जाणून घेऊ...वाढत्या वयाबरोबर त्वचेचे विकार वाढण्याची शक्यता जास्त असते. मात्र वेळेवरच काळजी घेतल्यास निरोगी व नितळ त्वचा दिर्घ काळापर्यंत जोपासली जाऊ शकते. आपले आरोग्य निरोगी असेल तर आपली त्वचादेखील तकाकीयुक्त, नितळ व मुलायम राहते. आपल्या शरीराचे संरक्षण करण्यात त्वचेची भूमिक ा  अत्यंत महत्त्वाची आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम हा सर्वप्रथम त्वचेवरच होतो. तारुण्यातील तारुण्यपिटीका, म्हातारपणातील सुरकुत्या आणि राग आल्यास लाल रंग धारण करणे हे त्वचेचे गुणधर्म आहेत. त्वचा विकार होण्याची प्रमुख कारणे-*  सतत फास्ट फूडचे सेवन करणे.*  त्वचेच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्षित असणे.*  सतत धूळ, माती व प्रदूषणाच्या संपर्कात राहणे.*  त्वचेचे विकार झालेल्यांच्या संपर्कात राहणे. *  आंघोळ किंवा घाम आल्यावर त्वचेची काळजी न घेणे म्हणजेच व्यवस्थित कोरडी न करणे. *  केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर अती वापर करणे. त्वचा विकार झाल्याची काही लक्षणे*  त्वचा नेहमी खाज येणे व कोरडी पडणे किंवा कोंड्याची निर्माण होणे*  तारुण्यपिटीका व पुरळ येणे*  त्वचेचा काहीभाग लालसर होणे तसेच दाह होणे*  त्वचेचे मूळ रंग बदलणे*  त्वचेला दुर्गंध येणे. त्वचेची काळजी कशी घ्याल?*  आंघोळीनंतर किंवा घाम आल्यानंतर त्वचा ओलसर असल्यास त्वचा काळजीपूर्वक कोरडी करणे तसेच जास्त घाम येणाºया ठिकाणी पावडर वापरणे.*  त्वचेवर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे *  त्वचा नितळ व निरोगी राहण्यासाठी आहारदेखील महत्त्वाचा असून त्यात गाईचे तूप, बदाम, खजूर आदी सारख्या सुका मेवांचा समावेश असावा. * त्वचेची विशेषत: कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दुधावरची साय चांगले मॉयश्चरायझरचा वापर करावा.*  त्वचेचा ओलावा टिकाविण्यासाठी पाणी भरपूर प्यावे तसेच आॅलिव्ह आॅइल किंवा तेलाचा वापर करावा. *  त्वचेला कांती मिळविण्यासाठी किंवा उजळ रंग प्राप्त होण्यासाठी त्वचेवर ब्लिचचा वापर शक्यतो टाळावा. * ग्रामीण भागातील मुलांच्या त्वचेवर मोठ्या आकारातील पुरळ येत असतात. यालाच बँड असे म्हणतात. हा एक त्वचेचा विकार असून त्वचेची अस्वच्छता हेच त्याचे मुख्य कारण आहे.* केमिकल्सयुक्त साबणाऐवजी नैसर्गित घटक असलेल्या आयुर्वेदिक उटण्याचा वापर करावा. तयार करा घरगुती आयुर्वेदिक उटणेडाळीचे पीठ + संतरा साल + आवळा पावडर +  अनंता + नागरमोथा + वाळा + चंदन पावडर  हे सर्व घटक एकत्र वाटून घेऊन भरणीत भरून ठेवावे आणि आंघोळीसाठी याचाच वापर करावा. हे उटणे आंघोळीसाठी वापरल्याने त्वचेचे आरोग्य निरोगी राहुन नितळ व मुलायम होते.