या स्मार्टफोनमध्ये ३१ डिसेंबरला बंद होईल ‘व्हॉट्स अॅप’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 17:24 IST
जर आपण सिम्बियन आॅपरेटिंग सिस्टमचे स्मार्टफोन आणि त्यात व्हॉट्स अॅप वापरत असाल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे.
या स्मार्टफोनमध्ये ३१ डिसेंबरला बंद होईल ‘व्हॉट्स अॅप’
जर आपण सिम्बियन आॅपरेटिंग सिस्टमचे स्मार्टफोन आणि त्यात व्हॉट्स अॅप वापरत असाल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. ३१ डिसेंबरला या आॅपरेटिंग सिस्टीमच्या स्मार्टफोनमधील व्हॉट्स अॅपची सुविधा बंद होणार आहे. या वृत्तास ‘द चॅट अॅप’ ने दुजोरा दिला असून, आगामी काळात विंडोज आणि ब्लॅकबेरी सारख्या फोनमध्येदेखील ही सुविधा बंद होणार आहे. फक्त अँड्राईड २.१ आणि अँड्राईड २.२ मध्येच ही सुविधा उपलब्ध असणार आहे. ब्लॅकबेरी ओएस, ब्लॅकबेरी १०, नोकिया एस ४०, नोकिया एस६०, विंडोज फोन ७.१, आयफोन ३ जीएस आणि आयफोन ओएस ६ या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्स अॅपची सुविधा ३१ डिसेंबरला बंद होणार आहे.