शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

​SMART LOOK : डोक्यावर कमी केस आहेत? तरीही दिसा स्मार्ट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 17:50 IST

बऱ्याचदा डोक्यावर कमी केसांमुळे आपणास हवी तशी हेअरस्टाईल करता येत नाही. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप वेगळीच पडते त्यामुळे काही ठिकाणी तर लाजिरवाणेही व्हावे लागते.

-Ravindra Moreबदलते राहणीमान आणि धावपळीची जीवनशैली यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढत आहे, ही समस्या पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात असून अवेळीच डोक्याला टक्कल पडत आहे. बऱ्याचदा डोक्यावर कमी केसांमुळे आपणास हवी तशी हेअरस्टाईल करता येत नाही. यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप वेगळीच पडते त्यामुळे काही ठिकाणी तर लाजिरवाणेही व्हावे लागते. मात्र आता घाबरु नका, आपल्या डोक्यावर जरी कमी केसं असतील तरी अशा काही हेअरस्टाईल आहेत ज्याने आपला लूक आकर्षक वाटेल. * कोंब ओव्हरकोंब ओव्हर हा काही कट नसून केस विंचरायची एक पध्दत आहे. डोक्यावर ज्या भागात केस कमी आहेत त्या भागावरून बाजूचे केस कंगव्याच्या साहाय्याने फिरवल्यामुळे थोडा वेगळा लूक येऊ शकतो.* द रिसीडर हेअरस्टाईलया हेअरस्टाईलमध्ये साईडचे आणि मागचे केस लहान ठेवत डोक्याच्या वरच्या भागातले केस मोठे ठेवले जातात. यामुळे केसांचा थिकनेस जास्त असल्याचा लूक येतो.* बझ कट डोक्यावरचे केस अगदीच कमी असतील तर या कटचा आॅप्शन आहे. बझ कटमुळे एक रफ लूक मेंटेन करता येतो. यामध्ये संपूर्ण डोक्यावरचे केस झिरो मशीनने बारीक केले जातात. यावेळी स्टायलिस्टला झिरो मशीनचं २ किंवा ३ नंबरचं रेझर वापरायला सांगावं.* दाढी वाढविणेदाढी आणि केसांचं वेगवेगळं काँबिनेशन करत वेगळा लूक आणता येतो. डोक्यावर केस कमी असले तर दाढी वाढवत त्याबरोबर हेअरस्टाईल कोआॅर्डिनेट करणंही शक्य असतं. सध्या दाढी किंवा स्टबल ठेवण्याचा लूक इन आहे. त्यामुळे दुहेरी फायदा होऊ शकतो. या पध्दतीत दाढीच्या केसांची लांबी आणि डोक्यावरच्या केसांचा लूक कोआॅर्डिनेट करावा लागतो. हे ऐकायला कठीण वाटत असलं तरी चांगल्या हेअरड्रेसरकडे जात त्याच्या सल्ल्याने हा लूक सहज मिळवता येऊ शकतो.Also Read : ​मुलांनो, अशी करा हेअर स्टाईल !                   : ​​हेअर कलर निवडताना !