स्लिम-अँड-ट्रिम झाल्याने मोडले लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:04 IST
नवरे लोकांना जाड्या बायका आवडत नाहीत असा सर्वसाधारण समज आहे. मात्र अवाढव्य वजन कमी करून स्लिम-अँड-ट्रिम झालेल्या एकीला चक्क आपला नवरा गमवावा लागला आहे. अँजेला क्रिकमोर असे या लंडनमधील 36 वर्षीय ललनेचे नाव आहे. तिचे वजन सुमारे 86 किलो होते. त्यामध्ये तिने सुमारे 30 किलोची घट केली. एवढेच नाही तर संपूर्ण शरीराला कमनीय आकार दिला. शाळेत असताना अँजेला जाड नव्हती. मात्र नंतर तिचे वजन वाढले. त्यातच तिचे लग्नही झाले. मात्र एका मैत्रिणीची प्रेरणा घेऊन तिने वजन कमी करण्याचे ठरवले. चालण्याचा आणि इतर व्यायाम करुन तिने आपले वजन कमी केले. तिचा नवरा मात्र यावर खुश नव्हता. ती जाड होती, त्यावेळीच ती अधिक सुंदर दिसत होती असे त्याचे मत आहे. जाडी कमी करण्याच्या नादात ती स्वत:ची खूपच काळजी करू लागली. यामुळे तिचे आपल्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याचा आरोप तिच्या होणाºया नवºयाने केला आहे. वजन कमी के ल्याने लग्न तुटण्याची ही पहिलीच वेळ असावी.