शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

​सिद्धार्थवर अक्षय चिडला, अभिषेकचं स्पष्टिकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:19 IST

कॉमेडी नाईट्स बचाओ या शोच्या सेटवर मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधववर अक्षयकुमार चिडल्याप्रकरणी खुलासा समोर आला आहे.

कॉमेडी नाईट्स बचाओ या शोच्या सेटवर मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधववर अक्षयकुमार चिडल्याप्रकरणी खुलासा समोर आला आहे. 'हाऊसफुल्ल 3' मधला अक्षयचा सहकलाकार अभिषेक बच्चनने मजामस्तीत हा प्रकार घडल्याचं स्पष्ट केलं आहे. ते एका कॉमेडी शोमध्ये गेले होते, साहजिकच त्यांची टीम आमच्या टीमची टेर खेचत होती. त्यामुळे आमच्या हाऊसफुल्लच्या टीमनेही त्यांची मस्करी करायचं ठरवलं. मात्र दुदैर्वाने अर्धीच बातमी बाहेर आली आणि अक्षय सिद्धार्थवर चिडल्याचे गैरसमज पसरले. असं अभिषेकने सांगितल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलं आहे.अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हाऊसफुल्ल 3 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय, रितेश, लिझा हेडन आणि जॅकलिन फर्नांडिस कलर्सवरील कॉमेडी नाईटस बचाओ या कार्यक्रमात आले होते. एआयबी रोस्टच्या धर्तीवर असलेल्या या कार्यक्रमात नेहमीच पाहुण्यांची टर उडवली जाते. मात्र यावेळी विनोदाच्या नावाखाली केला जाणारा लिझाचा अपमान अक्षयला आवडला नाही आणि त्याचा पारा चढला, असं सांगितलं गेलं.आॅस्ट्रेलियाहून आलेल्या लिझा हेडनला सिद्धार्थ जाधवच्या स्कीटमध्ये कांगारु असं संबोधण्यात आलं. याचप्रमाणे आणखी एक वर्णद्वेषी कमेंट केल्यामुळे लिझा आणि जॅकलिन अनकम्फर्टेबल असल्याचं रितेश आणि अक्षयला जाणवलं. लिझाला जी भाषा समजतही नाही, त्या भाषेत तिच्यावर विनोद करणं अशोभनीय असल्याचं मत अक्षयने व्यक्त करत तात्काळ सिद्धार्थला थांबवल्याची माहिती होती.सिद्धार्थ जाधवने मात्र असं काहीच घडलं नसल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं होतं. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट असल्याची चचार्ही तेव्हा सुरु होती.