SHOCKING : वयस्क ‘स्त्री’ला डेट करणे फायद्याचे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 14:37 IST
वयस्कर स्त्रीने आयुष्यात अनेक अनुभव घेतलेले असतात आणि कुठलेही भावनिक ओझे न बाळगता ती तुमची साथ द्यायला तयार असते, म्हणून अशा स्त्रीसोबत भविष्यात भांडणे होण्याची शक्यता कमी असते.
SHOCKING : वयस्क ‘स्त्री’ला डेट करणे फायद्याचे !
बऱ्याचदा वयाचा फरक असलेल्या जोडप्यांकडे आश्चर्याने पाहिले जाते. वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीला डेट करणे ही विचारसरणी अजून रुढ झाली नसल्याच्या कारणाने कदाचित असे नाते संपुष्टात येत आहेत. मात्र एका संशोधनानुसार एखाद्या वयस्कर स्त्रीला डेट करणे अधिक चांगला अनुभव असू शकतो, हे सिद्ध झाले आहे. * वयस्कर स्त्री ही अधिक जबाबदार आणि समजदार असते. त्यामुळे अशा स्त्री सोबत असल्याने तुम्हाला जबाबदारपणा व समजूतदारपणाची जाणीव होईल. ती नात्यात पडणे किंवा बाहेर निघणे असे निर्णय तडकाफडकी घेत नाही. तिचा निर्णय विचारपूर्वक असेल.* वयस्कर स्त्रीने आयुष्यात अनेक अनुभव घेतलेले असतात आणि कुठलेही भावनिक ओझे न बाळगता ती तुमची साथ द्यायला तयार असते, म्हणून अशा स्त्रीसोबत भविष्यात भांडणे होण्याची शक्यता कमी असते. कदाचित ती आर्थिकदृट्याही स्थिर असेल, म्हणून अशा स्त्री सोबत नाते बनवायला काहीही हरकत नाही. * वयस्कर स्त्रिया संवादातही अधिक प्रभावशाली असतात. म्हणजेच तुम्ही आपल्या समस्या एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकता. तुमच्यात गैरसमज होण्याच्या शक्यता कमी राहतील. कोणत्याही नात्यातील ही फार मोठी जमेची बाजू आहे. यासोबतच ती एक संयमी श्रोता असेल आणि तुम्हाला तुमची स्पेस देईल.तुमच्या मनात जर वयस्कर स्त्रीला प्रपोज करण्याविषयी काही शंका असेल तर ती काढून टाका आणि पुढे चला. वय हा केवळ एक आकडा आहे.