सात वर्षांचा मुलगा अन् दारूचा खर्च 10 लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 07:43 IST
क्रिस रोकस यांची सुमारे 660 मिलिअन पाऊंड म्हणजे सुमारे 63521982810 रुपये ( 6 हजार 352 कोटी रुपये) संपत्ती आहे.
सात वर्षांचा मुलगा अन् दारूचा खर्च 10 लाख
लंडनमध्ये एका महिलेने पतीकडे दरमहा साडेदहा हजार पाऊंड म्हणजेच सुमारे 10 लाख रुपयांची मागणी केली. विशेष म्हणजे 7 वर्षांच्या मुलाच्या दारूवरील खचार्साठी दहा लाख रुपये तिने मागितले होते. क्रिस रोकस यांची सुमारे 660 मिलिअन पाऊंड म्हणजे सुमारे 63521982810 रुपये ( 6 हजार 352 कोटी रुपये) संपत्ती आहे. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी पत्नी वेरोनिकापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर कोटार्ने पत्नीला दरमहा 12 हजार पाऊंड ( 11.5 लाख रुपये) देण्याचे आदेश दिले. वेरोनिकाला चाईल्ड सपोर्ट म्हणून साडेसात लाख रुपये मिळणार आहेत. यात टॅक्सी सेवा, स्विमिंग क्लासेसची फी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त वेरोनिकाने दहा लाख रुपयांची मागणी केली होती.मुलाच्या दारूवरील खर्चासाठी ही रक्कम तिने मागितली. मात्र मुलाचे वय केवळ 7 वर्ष असून तो या वयात दारू पिऊ शकत नाही, असे सांगत कोर्टाने मागणी नाकारली आहे. तरीही यातील काही रक्कम देण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे.