सॅन्ड्रा माझी बॉस हॉलिवूड स्टार जॉर्ज क्लूनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:15 IST
हॉलिवूड स्टार जॉर्ज क्लूनी आणि सॅन्ड्रा बुलॉक हे दोघे अनेक वर्षांपासून मित्र आहेत.
सॅन्ड्रा माझी बॉस हॉलिवूड स्टार जॉर्ज क्लूनी
मात्र, ते जेव्हा एकत्र काम करायला लागले आहेत तेव्हापासून जॉर्जचे असे म्हणणे आहे की, सॅन्ड्रा त्याच्यापेक्षा सरस असून, कामात ती बॉस असल्याचे जाणवते. हे दोघेही सध्या एका नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. आवर ब्रँड इज क्रायसीस असे या प्रोजेक्टचे नाव आहे. क्लूनी याची निर्माती असून, बुलॉक यात मुख्य भूमिकेत आहे. आपल्यासोबत कुणीतरी बसलेले असणे खूप धीर देणारे असते. तसेच काहीसे चित्रपटातही पाहता येणार असल्याचेही तो सांगतो.