सॅण्ड्रा बुलकने घेतली मुलगी दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:39 IST
सॅण्ड्रा बुलकने घेतली मुलगी दत्तकऑस्कर विजेती अभिनेत्री सॅण्ड्रा बुलकनं मुलगी दत्तक घेतलीय.
सॅण्ड्रा बुलकने घेतली मुलगी दत्तक
सॅण्ड्रा बुलकने घेतली मुलगी दत्तकऑस्कर विजेती अभिनेत्री सॅण्ड्रा बुलकनं मुलगी दत्तक घेतलीय. बुधवारी तिनं तसं जाहीर केलं. आपल्या लुईस या मुलासाठी मी तीन वर्षीय बहीण आणलीय. तिचं नाव लैला ठेवलंय. गेल्या तीन वर्षांपासून आपण या मुलीचं संगोपन करतोय, असं तिनं सांगितलं. लुझियाना येथील संगोपनालयात तिला ठेवलं होतं. सॅण्ड्रा म्हणाली, की मी लैलाला पाहिल्यावरच तिला दत्तक घेण्याचा निर्णय पक्का केला. अगदी योग्य वेळी योग्य मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे. सॅण्ड्रानं २0१0 मध्ये मुलगा लुईसला दत्तक घेतलं होतं. तो आता पाच वर्षांचा आहे. माझं कुटुंब प्रेमळ, समंजस, समजूतदार आणि वैविध्यानं नटल्याचंही सॅण्ड्रानं नमूद केलंय.