सलमाचा खोटारडेपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:48 IST
सलमाचा खोटारडेपणासलमा ब्लेयर हिने करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये किशोरवयीन मुलीची भूमिका पार पाडली आहे. खरे वय लपविण्यासाठी तिला बर्याचदा खोटं बोलावे लागले.
सलमाचा खोटारडेपणा
सलमा ब्लेयर हिने करिअरच्या सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये किशोरवयीन मुलीची भूमिका पार पाडली आहे. खरे वय लपविण्यासाठी तिला बर्याचदा खोटं बोलावे लागले. याबाबत सलमा सांगते की, जेव्हा पहिल्यांदा ती पडद्यावर झळकली, तेव्हा तिची कॉलेज लाईफ संपली होती. मात्र अशातही छोट्या मुलांच्या भूमिकांची ऑफर येत असल्याने मला खोटं बोलवे लागत होते. जेव्हा मी १८ वर्षांच्या मुलीचा रोल केला तेव्हा माझे वास्तविक वय २६ वर्ष होते, असेही सलमाने सांगितले.स्विफ्टचे गिफ्टपॉप स्टार टेलर स्विफ्टने तिच्या एका कॅँसरपिडीत फॅनला अचानक भेट देवून ख्रिसमसचे शानदार गिफ्ट दिले आहे. स्विफ्ट ख्रिसमसच्या सुट्टय़ा सार्जया करण्यासाठी घरी जात होती. मात्र तिला तिच्या फॅन्सची बातमी कळाल्यानंतर तिने थेट हॉस्पिटल गाठून त्याची भेट घेतली. शिवाय तिला ख्रिसमस गिफ्टही दिले. याबाबतचा स्विफ्टने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला असून, त्याखाली मला आज खूप आनंद होत असून, माझ्या या फॅन्सने लवकर बरे व्हावे, असे लिहिले आहे.घर वापसीब्रिटिश अभिनेता ओरलॅँडो ब्लम हा नवी दिल्ली येथे पोहचल्यानंतर त्याला लगचेच ब्रिटनला परत पाठविण्यात आले. कारण त्याचा ई-वीजा रद्द करण्यात आला. त्यानंतर विदेशमंत्री सुषमा स्वराज त्याच्या मदतीला धावून आल्या. उत्तर प्रदेश सरकारने त्याला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. मात्र जेव्हा तो भारतात दाखल झाला तेव्हा त्याला त्याचा ई-वीजा रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर स्वराज यांनी लगेचच लंडन येथील भारतीय उच्चायुक्तांशी चर्चा करून वीजा जारी करण्यास सांगितले.