सलमानच्या बर्थडेला 'सुल्तान'चा दुसरा टीजर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:59 IST
सलमान खानचे सर्व चाहते वाट पाहताहेत ती २७ डिसेंबरची. त्यांचा आवडता अभिनेता सलमान खान ५0 वर्षांचा हो...
सलमानच्या बर्थडेला 'सुल्तान'चा दुसरा टीजर?
सलमान खानचे सर्व चाहते वाट पाहताहेत ती २७ डिसेंबरची. त्यांचा आवडता अभिनेता सलमान खान ५0 वर्षांचा होणार आहे. येणारे वर्ष हे त्याच्यासाठी फारच स्पेशल आहे. एकतर त्याची कोर्टाच्या फेर्यातून मुक्तता झाली आहे. आणि दुसरे म्हणजे त्याची हाफ सेंच्युरी झाली आहे. यशराज फिल्म्सचा आगामी चित्रपट 'सुल्तान' या प्रोजेक्टअंतर्गत तो काम करतोय. चित्रपटाचा दुसरा टीजर सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलीज करण्यात येईल असे कळते. यात सलमान पहेलवानाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी तो स्पेशल ट्रेनिंगमधून गेला असून चक्क १४ किलो वजन वाढवले आहे.