सचिन मिसिंग 10!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:44 IST
उपहारगृह लवकर बंद होणार आहे त्यामुळे आता सचिनला १0 नंबरच्या टेबलवर बसता येणार नाही.
सचिन मिसिंग 10!
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे १0 आकड्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. क्रिकेट असो, अथवा खवय्येगिरी हा मास्टरब्लास्टर १0 हा आकडाच पसंत करतो.मुंबईतील झोडियाक ग्रील या सुप्रसिद्ध उपहारगृहामध्ये तो नियमित जात होता. त्या ठिकाणी आल्यानंतर सचिन १0 नंबरच्या टेबलवर बसत असे.केंबर्ट डेरिओल आणि ग्रील्ड चिकन अशी त्याची फेवरेट ऑर्डर ठरलेली होती. पण, आता मात्र त्याला या उपहारगृहात जाता येणार नाही.कारण हे उपहारगृह लवकर बंद होणार आहे. त्यामुळे आता सचिनला या उपहारगृहातील १0 नंबरच्या टेबलवर बसता येणार नाही.