शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

READ HERE: सात वर्षांच्या मुलीने केला गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 18:28 IST

सात वर्षांच्या क्लो ब्रिजवाटर या मुलीला गुगलमध्ये काम करायचे असून त्यासाठी तिने खूप प्रेमळ अर्जदेखील केला आहे. तिने लिहिलेल्या पत्राला ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचई यांनी उत्तर दिले आहे. ते वाचून तुम्हीदेखील खुश होऊन जाल...

लहान मुलांना आपण नेहमी विचारतो की, मोठ्यापणी तुला काय व्हायचे? त्यावर पायलट, वकील, इंजिनिअर, डॉक्टर, शास्त्रज्ञ किंवा पोलीस असे उत्तर मिळते. पण तुम्ही जर हा प्रश्न सात वर्षांच्या क्लो ब्रिजवाटर या मुलीला विचाराल तर तिचे उत्तर ऐकून तुम्ही हैराण होऊन जाल. महत्त्वकांक्षी क्लोला मोठ्यापणी जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी ‘गुगल’मध्ये काम करायचे आहे.बरं नुसते काम करण्याचे तिचे स्वप्न नाही. त्याची तयारी तिने आतापासूनच सुरू केलेली आहे. गुगलचे बॉस अर्थातच सीईओ सुंदर पिचई यांना तिने नोकरीचा अर्ज वजा पत्रसुद्धा लिहिले आहे. आपल्या वाकड्यातिकड्या परंतु तेवढ्याच गोड-निरागस भाषेत तिने गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखविली.                                    पत्रात ती लिहिते की,  ‘माझ्या वडिलांनी मला सांगितले की, गुगलमध्ये नोकरी करताना मी बीन बॅगवर बसू शकते, घसरगुंडीवर मजा करू शकते आणि कार्ट राईडिंगही करू शकते.’ तसेच तिने कॉम्प्यटर आवडत असल्याचे व टॅबवर गेम खेळता येत असल्याचेही सांगितले. इंग्लंडमध्ये हिअरफोर्ड येथे राहणाऱ्या क्लोला मोठेपणी गुगलबरोबच चॉकलेटच्या कारखान्यात काम आणि आॅलिम्पिकमध्ये पोहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.                                     बहिणीबद्दल सांगताना ती म्हणते की, माझी लहान बहिणसुद्धा खूप हुशार आहे परंतु तिला फक्त बाहुलीसोबत खेळायला आवडते. माझे सर्व शिक्षक मला शब्बासकी देतात. पत्राच्या शेवटी ती लिहिते की, माझे पत्र वाचल्याबद्दल धन्यवाद. हे माझे दुसरेच पत्र असून या आधी मी केवळ माझ्या वडिलांना नाताळानिमित्त पत्र लिहिले होते.क्लोने लिहिलेले हे पत्र तिचे वडिल अँडी ब्रिजवाटर यांनी लिंक्डइनवर पोस्ट केले. इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर ते पोहचले थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांच्यापाशी. सात वर्षांच्या या मुलीच्या लिखाणाने तेदेखील खूप प्रभावित झाले आणि तिच्या पत्राला उत्तर दिले. पिचई यांनी पाठवलेले उत्तर अँडी यांनी सोशल मीडियावर शेअर केले.पिचई यांनी लिहिले की,                                                           प्रिय क्लो,                                                          तुझ्या पत्रासाठी धन्यवाद. तुला कॉम्प्युटर आणि रोबोट आवडतात हे वाचून खूप आनंद वाटला.                                                          मला खात्री आहे की, तु तंत्रज्ञानविषयीची जिज्ञासा कायम ठेववण्यासाठी प्रयत्नशील राहशील.                                                          तु जर कठोर मेहनत घेतली तर तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होतील.                                                          मग ते गुगलमध्ये काम करण्याचे असो वा आॅलिम्पिकमध्ये पोहण्याचे.                                                          तुझे शिक्षणपूर्ण झाल्यावर तुझ्या नोकरीच्या अर्जाची मी वाट पाहतोय.                                                          तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा!                                     सुंदर पिचईसारख्या अत्यंत व्यस्त व्यक्तीने सात वर्षांच्या मुलीच्या पत्राला असे उत्तर दिल्याने क्लोचे वडिल फार भारावले. ते म्हणतात, ‘मला वाटले नव्हते की ते कधी रिप्लाय करतील. परंतु त्यांनी पाठवलेल्या पत्रामुळे माझ्या मुलीला खूप आनंद झाला असून तिचा कॉम्प्युटरमधील रस वाढला आहे.’ काही वर्षांपूर्वी क्लो कार अपघातामध्ये जखमी झाली होती. बरी झाल्यावर वडिलांनी तिला इंग्लंडमधील गुगल आॅफिसमध्ये नेले होते. तेव्हापासून तिला तेथे काम करण्याची इच्छा निर्माण झाली होती.