प्रियंका कॅटीची मेकअप आयकॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 21:19 IST
बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोपडाचा सध्या हॉलीवुडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. तेथील माध्यमांसाठी तर प्रियंका नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे.
प्रियंका कॅटीची मेकअप आयकॉन
बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोपडाचा सध्या हॉलीवुडमध्ये चांगलाच बोलबाला आहे. तेथील माध्यमांसाठी तर प्रियंका नेहमीच चर्चेचा विषय बनली आहे. आता हेच बघा ना, अमेरिकी अभिनेत्री केटी लोव्ससाठी म्हणे प्रियंका चक्क मेकअप आयकॉन बनली आहे. याबाबत कॅटीने बुधवारी रात्री ट्विटरवर लिहले की, मेकअपसाठी प्रियंकाने मला दिलेल्या प्रेरणेबद्दल धन्यवाद! यावेळी तिने एका मॅग्जीन क्लिपिंगचा फोटो देखील शेअर केला. प्रियंका सध्या ‘बेवॉच’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तरी सुद्धा तिने कॅटीच्या ट्विटला उत्तर देताना तिचा अभिनय मला भावला असल्याचे सांगितले आहे.