प्रिन्सच्या चाहत्यांनो, घ्यायची का 12 कोटींची कार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 19:59 IST
गडद जांभळ्या रंगाची ही हायब्रिड कार प्रिन्सच्या आठवणीत तयार करण्यात आली आहे.
प्रिन्सच्या चाहत्यांनो, घ्यायची का 12 कोटींची कार?
पॉपस्टार प्रिन्सच्या अकाली निधनामुळे संगीतविश्वात कमालीचे दु:ख पसरले आहे. त्याच्या चाहत्यांना तर अजूनही लाडक्या प्रिन्सच्या जाण्यावर विश्वास बसत नाहीए.सर्व स्तरातून शोकसंदेश येत आहेत. प्रिन्सच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत. त्याला उचित श्रद्धांजली देण्याची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. स्वीडनची कंपनी कोएनीगसेगने रिगेरा मॉडलेची कस्टम कार डिझाईन केली आहे. गडद जांभळ्या रंगाची ही हायब्रिड कार प्रिन्सच्या आठवणीत तयार करण्यात आली आहे.कंपनीच्या फेसबुक पेजवर या कारचे फोटो अपलोड करण्यात आले असून स्वीडिश भाषेत तिला ‘लिला रिगेरा’ असे नाव देण्यात आले आहे. जांभळे साम्राज्य असा त्याचा अर्थ होतो.कोएनीगसेग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कारचे ट्रान्सफॉरमेशन होण्यासाठी रात्रभर वाट पाहावी लागली. सामान्यपणे आम्ही आॅर्डर आल्यावरच कारची निर्मिती करतो परंतु आम्हाला अपेक्षा आहे की, या कारला खरेदी करण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतील.या कारची किंमत 19 लाख डॉलर्स (12.65 कोटी रु.) एवढी आहे.